शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर 'धर्मसंकट'; उल्हासनगर महापालिकेची पहिलीच महासभा वादाच्या भोवऱ्यात, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:24 IST

पाणीपट्टी आणि सेवा शुल्कात प्रचंड दरवाढीचा प्रस्ताव... शहरवासियांचे लक्ष शुक्रवारी होणाऱ्या महासभेकडे लक्ष...

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीनंतर शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पहिली विशेष महासभेचे आयोजित करण्यात आले. पहिल्याच विशेष महासभेत आयुक्त स्तरावरून पाणीपट्टी आणि विविध सेवा शुल्कांमध्ये मोठी दरवाढ सुचविण्यात आली असून या प्रस्तावामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर मोठे 'धर्मसंकट' उभे ठाकले असून, ते शहरवासीयांच्या खिशाला कात्री लावणार की दरवाढ फेटाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 उल्हासनगर महापालिकेच्या पहिल्या विशेष महासभेत आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी प्रशासनाकडून पाणीपट्टीत दरवाढीचा प्रस्ताव आणण्यात आला. आरसीसी बांधकामाला वार्षिक ३,६०० वरून थेट ८ हजार पाणीपट्टी दरवाढ सुचविली आहे. तर पत्र्याच्या घरासाठी १,८०० वरून थेट ६,५०० रुपये, झोपडी व लफाटे घरासाठी १,२०० रुपयांवरून ३,००० रुपये पाणीपट्टी दरवाढ सुचविली आहे. याशिवाय मालमत्ता पुनर्बांधणी, वाढीव बांधकाम आणि इतर नागरी सेवांच्या शुल्कातही मोठ्या प्रमाणात वाढ प्रस्तावित आहे. या दरवाढीच्या माध्यमातून पालिकेला वर्षाला ९० कोटी ८३ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न अपेक्षित आहे.

 आर्थिक डोलारा वाचवण्यासाठी दरवाढीचा प्रयत्न? महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बिकट असल्याचे चित्र आहे. अमृत योजनेअंतर्गत पाणी आणि भुयारी गटार योजनांचा ३० टक्के हिस्सा, वीजबिल आणि पाणी वितरण देखभाल यासाठी पालिकेवर वर्षाला २५८ कोटींची देणी आहेत. तसेच एमआयडीसीकडून विकत घेतलेल्या पाण्याच्या बिलापोटी पालिकेला तब्बल ९६० कोटी रुपये थकबाकी पोटी भरायचे आहेत. हा आर्थिक डोलारा सावरण्यासाठीच प्रशासनाने ही दरवाढ सुचविल्याचे बोलले जात आहे. 

स्वतःचा पाणी स्रोत नसल्याचा फटका उल्हासनगर शहरातून बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही पालिकेने आजवर स्वतःचा पाणी स्रोत निर्माण केलेला नाही. पालिकेचा २०२ कोटींचा स्वतःचा पाणी स्रोत प्रकल्प शासनाकडे धुळखात पडला आहे. परिणामी, महापालिकेला दरवर्षी ४६ कोटींचे पाणी एमआयडीसीकडून विकत घ्यावे लागते, ज्याचा भार आता सामान्य नागरिकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे.

 नवनिर्वाचित नगरसेवकापुढे धर्मसंकट नवनिर्वाचित नगरसेवक आपल्या पहिल्याच सभेत मतदारांना दरवाढीचा 'शॉक' देणार की प्रशासनाचा हा प्रस्ताव फेटाळून लावणार, याचा निकाल शुक्रवारी दुपारी ३ वाजता लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Corporators Face Dilemma: Water Tax Hike Sparks Controversy.

Web Summary : Newly elected Ulhasnagar corporators face a tough decision on proposed water tax hikes. The municipality, burdened by debt, seeks to increase revenue, potentially impacting citizens. Will corporators approve the hikes or reject them?
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMunicipal Corporationनगर पालिका