रिलायन्स-शेतकऱ्यांमधील संघर्ष,महिलेची विनयभंगाची लेखी तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 00:54 IST2020-01-23T00:53:49+5:302020-01-23T00:54:08+5:30
भिवंडी तालुक्यातून रिलायन्सचा दहेज- नागोठणे गॅस प्रकल्प जात असून या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता रिलायन्स पोलीस बळाचा वापव करून प्रकल्प दामटू पाहात असल्याचा प्रत्यय बुधवारी आला.

रिलायन्स-शेतकऱ्यांमधील संघर्ष,महिलेची विनयभंगाची लेखी तक्रार
वज्रेश्वरी: भिवंडी तालुक्यातून रिलायन्सचा दहेज- नागोठणे गॅस प्रकल्प जात असून या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मोबदला न देता रिलायन्स पोलीस बळाचा वापव करून प्रकल्प दामटू पाहात असल्याचा प्रत्यय बुधवारी आला. येथील शेतकºयांचे मोबाइल जप्त करून त्यांना पोलीस चौकीत बसवून ठेवून काम करण्यास सुरु वात केली. दरम्यान, महिलेने रिलायन्सच्या अधिकाºयाविरोधात विनयभंगाची तक्रार गणेशपुरी पोलीस ठाण्यात केली आहे.
मागील आठवड्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन शेतक-यांनी आपल्यावरील अन्यायाची कल्पना दिली होती. त्यावर त्यांनी या शेतकºयांना आश्वासन दिले होते. मात्र रिलायन्सने पोलीस बळाचा वापर करत शेतकरी व महिलांना धक्काबुक्की केली. त्यांना पालखणे पोलीस चौकीत डांबून ठेवले. दरम्यान, या प्रकारामुळे हर्षला पाटील यांचा रक्तदाब वाढल्याने त्या बेशुद्ध होऊन कोसळल्या.
रिलायन्सचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात काम करायला आले असता, आमचा पूर्ण मोबदला देऊन नंतर काम करा अशी मागणी करणा-या शेतक-यांना दमदाटी करत एका अधिका-याने महिलेचा विनयभंग केला यासंदर्भात गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करायला गेले असता पोलिसांनी महिलेला रात्री उशिरापर्यंत बसवून ठेवत गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. त्यामुळे या महिलेने लेखी तक्रार दिली आहे.