शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:59 IST

डिम्पल रुग्णालयात एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.

म्हारळ : येथील डिम्पल रुग्णालयात एका महिलेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर महिलेच्या संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयास घेराव घालून संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी उल्हासनगरातील हनुमाननगरात राहणाऱ्या ५0 वर्षीय विमला पाठक यांना म्हारळ येथील राधाकृष्णनगरी येथील डॉक्टर नागपाल यांच्या डिम्पल रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पोटात गाठ असल्याने त्यांची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. दुसºया दिवशी, रविवारी दुपारी डॉक्टर नागपाल यांनी पाठक यांच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु, सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान प्रकृती अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात घेराव घालून रुग्णाच्या मृत्यूस डॉक्टर नागपाल जबाबदार असल्याचा आरोप केला. नातेवाइकांचा गोंधळ सुरू असताना, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. परंतु, तिथे न्याय मिळणार नसल्याचा आरोप करत, नातेवाइकांनी मृतदेह मुंबई येथील जे.जे. रु ग्णालयात पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार, महिलेचे शवविच्छेदन जे.जे. रुग्णालयात करण्यात आले. म्हारळ पोलीस चौकीचे उपनिरीक्षक बजरंग राजपूत यांनी दिल्यानुसार, याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे आरोग्य विभागासह जे.जे. रु ग्णालयाचा शवविच्छेदन अहवाल हाती आल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.विमला पाठक यांच्यावर बिर्ला गेट येथील सेंच्युरी रु ग्णालयात डॉक्टर मोरनकर यांच्याकडेही उपचार सुरू होते. पाठक यांचे पुत्र अमित यांनी सांगितले की, डॉक्टर नागपाल हेदेखील तेथे कार्यरत असल्याने त्यांनी त्यांच्या म्हारळ येथील डिम्पल रु ग्णालयात कमी खर्चात शस्त्रक्रिया करू, असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्यासाठी सहमती दर्शवली होती, असे अमित यांनी सांगितले. यासंदर्भात डॉक्टर नागपाल यांच्या पत्नी ज्योती नागपाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रि या देण्यास नकार दिला.>हॉस्पिटलमध्ये जीवनावश्यक सुविधाच नसून, आईचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा अमित यांनी केला. हॉस्पिटलचे फुटेज तपासून, दोषींवर कारवाईची मागणी यावेळी कुटुंबीयांनी केली.