शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

वेदांतमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 00:08 IST

वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यु झाल्याचा दावा केला जात असला तरी यात चार नव्हे तर पाच जणांचा मृत्यु झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्दे मृतदेहांसाठी राहावे लागले तिष्ठत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वर्तकनगर येथील वेदांत रुग्णालयात सोमवारी अवघ्या १२ तासांमध्ये चार कोविड रुग्णांचे मृत्यु झाल्याचा दावा केला जात असला तरी यात चार नव्हे तर पाच जणांचा मृत्यु झाल्याचा दावा अन्य एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच विठ्ठल राठोड यांचाही मृत्युही झाल्याचा आरोप दिलीप राठोड यांनी केला आहे.वेदांत रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५३ रुग्ण दाखल होते. त्यातीलच अरुण शेलार (५१), वरुणा पासते (६७), दिनेश तानकर (४१) आणि विजय पाटील (५७) या चौघांचाच मृत्यु झाल्याचा दावा रुग्णालय आणि ठाणे पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, सोमवारी ११.३० वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल राठोड या अन्य एका रुग्णाचाही मृत्यु झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. विठ्ठल हे सोमवारी पहाटेपर्यंत चांगले होते. अगदी रविवारी सुद्धा त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांची आॅक्सिजन पातळीही चांगली होती. मग, त्यांचा अचानक मृत्यु कसा झाला? यात रुग्णालय प्रशासनाचाच हलगर्जीपणा असून त्यांना आॅक्सिजनचा पुरवठा अपुरा पडल्याचा संशय राठोड यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयात भेट दिली. त्यावेळी राठोड कुटूंबीयांनी आपली कैफियत मांडली. जर पाच मृत्यु असतील तर राठोड यांच्याही मृत्युची चौकशी केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.आठ तास उलटूनही मृतदेहाची प्रतिक्षा-या चार जणांचे सकाळी मृत्यु झाल्यानंतर दुपारी ४ पर्यंत नातेवाईकांना मृतदेह ताब्यात देण्यात आले नसल्याचीही तक्रार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी हे मृतदेह कोविडचे असल्यामुळे थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेले जातात. परंतू, कोणाचीही अडवणूक रुग्णालयाने न करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस