उथळसर येथील रहिवाशांचे पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासोमर धरणो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 19:05 IST2019-02-15T18:42:25+5:302019-02-15T19:05:27+5:30
ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील जोगीला मार्केट तसेच आनंद नगर येथील रहिवाश्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. येथील सरकारी जागेवर सुमारे 5क् वर्षापासून या रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांकडे 1995 पासूनचे पुरावे असतांना देखिल ठाणो महापालिका प्रशासनाकडून या लोकवस्तीवर कार्यवाही करण्यात आली. यामुळे संतापलेल्या रहिवाश्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले.

ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रहिवाश्यांनी मोठय़ासंख्येने एकत्र येऊन धरणो आंदोलन छेडले.
ठाणो : उथळसर येथील जोगिला तलावाच्या परिसारातील सारकारी जागेवर झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत सरकारी जागा दंड आकारु न नियमाकूल करावे या मागणीसाठी ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रहिवाश्यांनी मोठय़ासंख्येने एकत्र येऊन धरणो आंदोलन छेडले. संबोधी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने छेडलेल्या या आंदोलनाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले.
ठाण्यातील उथळसर प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील जोगीला मार्केट तसेच आनंद नगर येथील रहिवाश्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. येथील सरकारी जागेवर सुमारे 55 वर्षापासून या रहिवाश्यांचे वास्तव्य आहे. येथील रहिवाश्यांकडे 1995 पासूनचे पुरावे असतांना देखिल ठाणो महापालिका प्रशासनाकडून या लोकवस्तीवर कार्यवाही करण्यात आली. यामुळे संतापलेल्या रहिवाश्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले. नागरीकांना योग्य जागेवर शक्य तितक्या लवकर संबंधीत बाधीत झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, असे बांधीत रहिवाश्यांकडून सांगितले जात आहे.
मात्र, अद्यापही पुर्नवसन करण्यात आले नसल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. यामुळे रहिवाशांच्या मूलभूत प्रशनाकडे लक्ष केंद्रीत करून आणि सरकारी जागेवर दंड आकारून झोपडपट्टी धारकाना गृहनिर्माण संस्थेसाठी नियमानुकूल करण्यात यावे. या मागणीसाठी संबोधी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने शुक्रवारी ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून प्रशासनास धारेवर धरल्याचे दिसून आले.