महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:15 PM2019-12-09T23:15:07+5:302019-12-09T23:15:45+5:30

वाढती महागाई, सोन्याचे गगनाला भिडणारे दर लक्षात घेता आजकाल लग्नसोहळ्यांवरदेखील काहीसे निर्बंध येऊ लागले आहेत.

Registration marriages preferred by inflation; There were 3359 marriages in the year | महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह

महागाईमुळे नोंदणी विवाहांना पसंती; वर्षभरात लागले ३३५९ विवाह

googlenewsNext

ठाणे : वाढती महागाई, सोन्याचे गगनाला भिडणारे दर लक्षात घेता आजकाल लग्नसोहळ्यांवरदेखील काहीसे निर्बंध येऊ लागले आहेत. पूर्वी धामधुमीत होणारे लग्न सोहळे आता कमी झाले असून त्यांची जागा आता रजिस्टर मॅरेजने अधिक प्रमाणात घेतल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत तीन हजार ३५९ विवाह अशा पद्धतीने झाल्याची माहिती जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयाने दिली.

एकीकडे विधिवत मुहूर्त काढून लग्न लावण्यावर पूर्वी भर असायचा. सर्व विधी हे मुहूर्तावर केले जात होते. आजकाल मात्र काडीमुहूर्तावरदेखील लग्नसोहळे उरकले जातात. आपल्याकडे तुळशीविवाह झाला की, लग्नसोहळ्याला सुरुवात होत असते. परंतु, आता बदललेल्या चालीरीतीनुसार मुहूर्ताचीही वाट पाहिली जात नसून नोव्हेंबरमध्ये पाठोपाठ आलेल्या अमावस्येच्या मुहूर्तावर एक, दोन नाही तर तब्बल १८ विवाह पार पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही लग्नसोहळ्यावर केले जाणारे खर्चही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. त्यामुळेच आता नोंदणी विवाहांना पसंती मिळू लागली आहे.

पोेशाखांचा ट्रेण्ड बदलतोय

त्यातच, आता लग्नसोहळ्यासाठी एक वेगळा ट्रेण्डही निर्माण झाला आहे. लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा दिवस. लग्नसराई हा दोन कुटुंबांचा नव्या नात्याचा सोहळा मानण्यात येतो. त्यामुळे वधूवरांसह त्यांच्या नातेवाइकांना मिरवण्याची यातून संधी प्राप्त होते. त्यामुळेच की काय, साखरपुड्यापूर्वी दोन्हीकडची मंडळी खास बस्ता बांधण्यासाठी जात असतात. आताही तो बांधला जातो. परंतु, वधूवरांच्या कपड्यांचा ट्रेण्ड बदलला आहे. वधूही पैठणीकडे पाठ फिरवून चनियाचोळीला पसंती देत आहेत. वर सुटबूट टाळून शेरवानीकडे वळले आहेत. वर पाश्चिमात्य पद्धतीच्या पेशवाई, पटियाळा यांना पसंती देत आहेत.

मेकअपचा चेहरामोहरा व हेअरस्टाइल

कालानुरूप लग्नातील वधूवरांचा पोशाख स्मार्ट झाला असतानाच हेअरस्टाइल, मेकअप आणि ज्वेलरीमध्येही स्मार्ट ट्रेण्ड्स आले आहेत. पूर्वी चापून-चोपून केस बांधणाऱ्या वधूला नवनवीन आलेल्या हेअरस्टाइल पसंतीस उतरत आहेत. त्यातल्या त्यात मेसी लुकवाल्या स्टाइलकडे वधंूचा अधिक कल दिसत आहे.

जेवणाचा मेनू पिझ्झासह चायनीजचा साज

लग्न म्हटले की, जेवण आलेच. पूर्वी वरणभात, पापड, लोणचे एखाद-दोन भाज्या,मिठाई किंवा कोशिंबिरीने थाळी सजली जायची. आता मेनूही बदलले आहेत. पनीर मख्खनवाला, पिझ्झा, गार्लिक टोस्ट, केक, डेझर्टची, चायनीजची मागणी वाढली आहे.

Web Title: Registration marriages preferred by inflation; There were 3359 marriages in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.