मनसेला पाठिंब्याबाबत काँग्रेसची हाताची घडी तोंडावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:36 AM2019-10-13T00:36:02+5:302019-10-13T00:37:03+5:30

वरिष्ठ नेत्यांचा नकार । स्थानिक नेते संभ्रमात

Regarding support to MNS, Congress hands the finger to the mouth | मनसेला पाठिंब्याबाबत काँग्रेसची हाताची घडी तोंडावर बोट

मनसेला पाठिंब्याबाबत काँग्रेसची हाताची घडी तोंडावर बोट

Next

ठाणे : ठाणे शहर मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेऊन थेट महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, काँग्रेसने तूर्तास तरी याबाबत हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मीरा-भार्इंदर मतदारसंघ काँग्रेसला आणि त्याबदल्यात ठाणे शहर राष्टÑवादीला असे वरिष्ठ पातळीवर ठरले होते. ठाणे मतदारसंघात राष्टÑवादीकडून दोन ते तीन इच्छुकांची नावे पुढे होती. तर, काँग्रेसकडून ११ ते १२ नावे पुढे आली होती. त्यामुळे हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे जाऊ नये, यासाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी एकत्र येऊन हा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची आग्रही मागणी वरिष्ठांकडे केली होती. मात्र, तरीसुद्धा तो काँग्रेसने राष्टÑवादीला सोडून दिलेला शब्द पाळला. परंतु, राष्टÑवादीने मतदारसंघ मिळूनही ऐनवेळी माघार घेऊन मनसेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. पाठिंब्यामुळे आघाडीतील राष्टÑवादीचा मित्रपक्ष काँग्रेसने मनसेला पाठिंबा द्यावा, यासाठी राष्टÑवादी आणि मनसेकडून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडे प्रयत्नही झाले. परंतु, काँग्रेसमधील इतर भाषिक नेत्यांमुळे मनसेला पाठिंबा द्यावा की देऊ नये, यासाठी राष्टÑीय पातळीवर विचारणा झाल्यावर राष्टÑीय पातळीवरील नेते मनसेला मदत करण्यास नकार देत आल्याचे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.

अन्य भाषिक नेत्यांची काळजी
काँग्रेसने मनसेला पाठिंबा दर्शवला, तर पक्षातील इतर भाषिक नेते दुखावतील, या भीतीमुळे जाहीररीत्या पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या राष्टÑीय पातळीवरील नेत्यांनी नकार स्पष्ट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. इत:पर स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते प्रत्यक्ष निवडणुकीत काय भूमिका घेतात, मनसेच्या उमेदवाराचा छुपा प्रचार करतात की छुपा प्रचार करत असल्याचे मनसेला केवळ भासवून, प्रत्यक्षात विरोधकांशी हातमिळवणी करतात, अशा प्रश्नांची उत्तरे मतमोजणीनंतरच मिळू शकणार आहेत.

Web Title: Regarding support to MNS, Congress hands the finger to the mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.