शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:04 PM

महापालिका मालमत्ता कर वसुलीला अभय योजनेच्या आशेने ब्रेक लागला आहे.

उल्हासनगर : महापालिका मालमत्ता कर वसुलीला अभय योजनेच्या आशेने ब्रेक लागला आहे. नागरिकांनी अभय योजनेकडे बोट दाखवत मालमत्ता कर भरण्यास नकारघंटा दाखवल्याने कर वसुली पथक कोंडीत सापडले आहे.उल्हासनगर पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कर वसुलीसाठी उपायुक्त संतोष देहरकर, विकास चव्हाण, उपायुक्त संतोष जाधव व नगररचनाकार मिलिंद सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पथके तयार केली आहेत. प्रत्येक चार पथकांची १२ उपपथके वसुलीसाठी तैनात केली असून या पथकांना सुखसुविधा दिल्या आहेत. तसेच शहरभर करवसुलीची जनजागृती करण्यात येत आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील साई पक्षाच्या नगरसेविका दीप्ती नावानी यांनी पक्षप्रमुख व उपमहापौर जीवन इदनानी यांच्या आदेशानुसार अभय योजनेचा प्रस्ताव आयुक्तांना दिला असून २० डिसेंबरच्या महासभेत हा प्रस्ताव घेण्यात आला आहे.महासभेत अभय योजनेचा प्रस्ताव आल्याने नागरिक प्रस्तावाकडे बोट दाखवत कर भरण्यास नकारघंटा देत आहेत. अभय योजनेच्या आशेने करवसुलीला बे्रक लागला असून मालमत्ता करावरील दंडासह व्याजाची रक्कम माफ होणार आहे. १०० टक्के दंड व व्याज माफ करण्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. अभय योजनेसाठी सत्ताधारी पक्षातील साई पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून ओमी टीमसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, भारिप, काँॅगे्रस, पीआरपी व मनसेने पाठिंबा दर्शविला आहे. आयुक्त अच्युत हांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी टप्प्याटप्प्यात अभय योजना लागू केल्याने प्रतिसाद मिळाला नाही.१०० कोटींच्या वसुलीची शक्यतानोटाबंदी, जीएसटीमुळे मंदी आल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिक देत आहेत. अभय योजनेमुळे एकूण मालमत्तेवरील व्याज व दंड १०० टक्के माफ होत असल्याच्या आशेतून नागरिक व व्यापारी कर भरण्यास प्रतिसाद देणार आहेत.त्यामुळे मालमत्ता कर वसुली १०० कोटींपेक्षा जास्त होणार असल्याची शक्यता व्यक्त होत असून आर्थिक संकटात सापडलेल्या पालिकेला नवसंजीवनी मिळणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMuncipal Corporationनगर पालिका