शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कपाळीचा लालभडक नाम हीच बनली होती अनंत तरेंची ओळख; निष्ठावान शिवसैनिक हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 23:39 IST

ठाणे शहर हे आगरी कोळी यांचे प्राबल्य असलेल्यांचे शहर.

ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक असलेले अनंत तरे हे मातृ - पितृभक्त होते. आई - वडिलांनी त्यांच्या कपाळी टिळा (नाम) लावला होता. कपाळावरील हा लाल रंगाचा नाम हीच तरे यांची वेगळी ओळख होती. अगदी बाळासाहेबांनाही हा टिळा आवडत होता. शेवटपर्यंत तरे यांनी ही ओळख जपली. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यानंतर `मातोश्री`चा विश्वास संपादन करणारे ते ठाण्यातील एकमेव नेेते होते. शिवसेनेत व ठाण्यात नवनेतृत्त्वाचा उदय झाल्यावर तरे यांचे महत्त्व कमी होत गेले. आज तर ते काळाच्या पडद्याआड निघून गेले.

ठाणे शहर हे आगरी कोळी यांचे प्राबल्य असलेल्यांचे शहर. शिवसेनेतून गणेश नाईक या आगरी समाजातील नेत्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर आनंद दिघे यांनी हेतूत: तरे यांना राजकारणात पुढे आणले. सलग तीनवेळा तरे यांना ठाणे शहराचे प्रथम नागरिक होण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. वाडवडिलांची पुण्याई अथवा राजकारणात वारसदारी नसतानाही एका सर्वसामान्य कोळी घरात जन्माला आलेल्या तरे यांनी अथक परिश्रम आणि शिवसेनेवरील निष्ठेने हे यश संपादन केले. श्रीरंग सोसायटीत राहणाऱ्या आणि माजीवडा इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकलेल्या तरे यांनी बांधकाम व्यवसायात उत्तुंग यश प्राप्त केले होते. मात्र, शिवसेना या चार अक्षरांची जादू, बाळासाहेबांवरील निष्ठा आणि दिघे यांचे आकर्षण यापोटी त्यांनी राजकारणात उडी घेतली.

१९९४च्या महापालिका निवडणुकीत अनंत तरे विक्रमी मतांनी निवडून आले. १९९२च्या दंगली व मुंबईतील बॉम्बस्फोट यामुळे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस लोकांच्या नजरेतून उतरली होती व शिवसेनेला राज्याची सत्ता खुणावत होती. ठाण्यात सेनेला अजून गती मिळावी, या हेतूने चाणाक्ष आनंद दिघे यांनी व्यवसायाने बिल्डर असलेल्या अनंत तरे यांची महापौर पदावर निवड केली. तरे यांनीही हा विश्वास सार्थ केला. पुढे तरे बाळासाहेब यांच्या गळ्यातील ताईत बनले. तरे ज्या एकवीरा देवी संस्थानचे अध्यक्ष होते तीच ठाकरे कुटुंबाची कुलदेवता असल्याने तरे यांचे बाळासाहेबांशी ऋणानुबंध घट्ट झाले.

तिसऱ्यांदा महापौरपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर दिघे आणि त्यांच्यात एका मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाले. दिघे हे कारागृहात असतांना तरे यांनी मातोश्रीसोबत आपली नाळ घट्ट जोडली. पुढे ते विधान परिषदेचे आमदार झाले. बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द शीरसावंद्य मानून तरे यांनी राजकारण केले.

रायगड जिल्ह्याशी कसलाही संबंध नसतांना तिथले संपर्कप्रमुख राहून निवडणूक लढवली होती. परंतु त्या निवडणुकीत निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. याच निवडणुकीच्या वेळी मतांच्या झालेल्या घोळामुळे तरे यांनी रागाच्या भरात एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली होती. रामशेठ ठाकूर यांच्यासारख्या बलाढ्य आर्थिक शक्ती असलेल्या नेत्याचाही त्यांनी निवडणुकीत मुकाबला केला. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व उभे राहिल्यावर बाळासाहेबांच्या काळातील अनेक नेते बाजूला केले गेले. त्यात तरे यांचाही समावेश होता. परंतु उपनेतेपदावरून त्यांना दूर केले नाही.

ठाण्याला आगरी- कोळी भुमिपुत्रांचे नेतृत्व नारायणराव कोळी यांच्यापासून अलीकडच्या देवराम भोईर, सुभाष भोईर, दशरथ पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी दिले. मात्र, तरे हे आपली वेगळीच छाप पाडून गेले. कॅसलिमल चौकात कोळी भवनाचे काम सुरू आहे. त्यासाठी तरे यांनी पाठपुरावा केला. अर्थात हे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा ते आपल्यात नसतील.

माजी आमदार आणि ठाण्याचे माजी महापौर, शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे निधन वेदनादायी आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते होते. ठाण्यात शिवसेना रुजवण्यात त्यांचेही योगदान होते. महादेव कोळी समाजाला आपले न्याय्यहक्क मिळावेत यासाठी त्यांनी प्रखर संघर्ष केला. आई एकविरेची त्यांच्यावर कृपा होती. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेना परिवार तरे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे - एकनाथ शिंदे,  शिवसेना नेते, नगरविकासमंत्री 

अनंत तरे यांच्या निधनाने एक लढवय्या, संघर्ष करणारा सैनिक, नेता आम्ही गमावला आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासात त्यांचे  मोलाचे योगदान आहे. त्यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीमध्ये ठाणे शहराचा विकास आराखडा आखण्यात आला. विरोधकांकडून महापौरपद खेचून महापौरपदाची हॅट्ट्रिक करणारे महापौर म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख होती. अत्यंत अभ्यासपूर्ण असे त्यांचे वक्तृत्व होते. - नरेश म्हस्के, महापौर,  ठाणे महापालिका

अनंत तरे यांच्या निधनाने ठाणेकरांविषयी आस्था असलेले एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व व आदरणीय नेते हरपले. सामान्य कुटुंबातून आलेल्या अनंत तरे यांनी ठाण्याचे महापौर पद तीन वेळा भूषविले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ठाणे शहरातील जनसामान्यांचे अनेक प्रश्न सोडविले.   - निरंजन वसंत डावखरे, आमदार व जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे