शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

शरद पाटील यांच्या कलेची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:03 IST

८४५ मान्यवरांची चित्रे रेखाटून घेतल्या स्वाक्षऱ्या

- जान्हवी मोर्येडोंबिवली : चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही एखाद्या मान्यवराचे हुबेहुबे चित्र रेखाटून नंतर त्याचीच स्वाक्षरी चित्राखाली स्वाक्षरी घेण्याचा छंद डोंबिवलीतील शरद पाटील यांना जडला होता. या त्यांच्या छंदाची दखल नुकतीच ‘लिम्का बुक ऑफ रेकार्ड’ने घेतली आहे. या रेकॉर्डमध्ये नोंद झालेले पाटील हे आगरी-कोळी समाजातील पहिले रेखाचित्रकार ठरले आहेत.पाटील यांचा जन्म डोंबिवलीत झाला. त्यांचे शालेय शिक्षण पाडुरंग विद्यालयात झाले. सध्या ते एका खाजगी कंपनीत हाउसकिपिंग सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. शाळेत त्यांनी चित्रकलेच्या अनेक स्पर्धेत सहभाग घेतला होता. इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असताना ते ठाणे केंद्रातून आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम आले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. मात्र, चित्रकलेचे प्रशिक्षण घेणे त्यांना नोकरीमुळे शक्य नव्हते. नामांकित चित्रकारांचे व्हिडीओपाहून त्यांनी आपली कला विकसित केली. पाटील यांना स्वाक्षरी घेण्याचा छंद होता, पण कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेणे त्यांना पसंत नव्हते. काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. प्रशिक्षण नसल्याने चित्र रेखाटायची कशी, असा प्रश्न त्यांना पडत असे. नियमित सराव आणि व्हिडीओ पाहून ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ही कला साधली. मान्यवरांची हुबेहुबे चित्र त्यांना साकारता येऊ लागली. त्या-त्या मान्यवरांना त्यांचे रेखाटलेले रेखाचित्र दाखवून ते त्यावर त्यांच्या स्वाक्षºया घेऊ लागले. पाहता पाहता त्यांच्या या छंदाचे रूपांतर एका संग्रहात झाले.पाटील यांच्या या संग्रहात आज नेते, अभिनेते, गायक, कवी, लेखक खेळाडू अशा विविध क्षेत्रांतील ८४५ मान्यवरांनी रेखाचित्रे व स्वाक्षºया आहेत. दिवसेंदिवस या संग्रहात वाढ होत आहे. पाटील यांच्याकडे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील विनोदी अभिनेता भरत जाधव याची २७५ रेखाचित्रे व स्वाक्षºया आहेत. भरत हा त्याचा आवडता अभिनेता आहे. त्यामुळे त्यांनी त्याची ५०० हून अधिक चित्रे रेखाटली आहेत, पण त्यातील अर्धी चित्रे भरत याच्या चाहत्यांना पाटील यांनी दिली आहेत. पाटील यांच्या संग्रहातील निवडक १६० चित्रांची निवड ‘लिम्का बुक आॅफ रेकार्ड’मध्ये झाली आहे.एखादा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एका कार्यक्रमासाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात आले होते. त्या कार्यक्रमादरम्यान पाटील यांनी त्यांचे रेखाचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. दरम्यान ही गोष्ट पुरंदरे यांना एका व्यक्तीने जाऊन सांगितली. पुरंदरे यांनी ते रेखाचित्र पाहण्यास मागविले. अर्धवट रेखाटलेले चित्र पाहून त्यावर पुरंदरे यांनी ‘तुम्ही मनात आणले तर काहीही करू शकता,’ असा संदेश दिला हीच जीवनातील सर्वांत मोठी थाप असल्याचे पाटील सांगतात. एखादा हृदयनाथ मंगेशकार यांनीही पाटील यांच्या चित्राचे कौतुक केले आहे.पाटील यांना इंडिया बुक आॅफ रेकॉड, आधार कलारत्न पुरस्कार, बेस्ट आॅफ इंडिया रेकॉड पुरस्कार, आधाररत्न पुरस्कार मिळाले आहेत. आता त्यांना गिनिज बुक आॅफ रेकार्डमध्ये जाण्याची इच्छा आहे.आगरी समाजातून या रेकार्डसाठी प्रयत्न करणारे ते पहिलीच व्यक्ती ठरणार आहेत. हा रेकार्ड त्यांना जानेवारी २०२० मध्ये करायचा आहे. या रेकार्डसाठी ते ड्राइंग पेपरवर ब्लेडने कट करून चेहरा तयार करत आहे. या कलेला किरगामी आर्ट, असे संबोधतात. किरगामी कला अवगत करण्यासाठी त्यांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागला.रंगभूमीवरही केले कामपाटील यांनी विविध प्रकारचे व्हिडीओ पाहून व मेहनतीच्या जोरावर आतापर्यंत ३५० ते ४०० चेहरे तयार केले आहेत. ज्या व्यक्ती त्यांना भेटतात त्यांचे ते चेहरे तयार करतात.यामध्ये देखील त्यांनी मराठी कलाकार, अभिनेते, क्रिकेपटू अशा विविध लोकांची चित्रे रेखाटली आहेत. पाटील यांनी काही काळ रंगभूमीवरही काम केले आहे. लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार यांच्याा धक्के बुक्के, युगे युगे कलयुगे नाटकामध्ये त्यांनी काम केले आहे.