शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

फडके रोडवर तरुणाईचा रेकॉर्डब्रेक

By admin | Updated: November 11, 2015 00:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची राजकीय धुळवड खाली बसल्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील फडके रोडवर तरुणाईमधील अपूर्व उत्साह

अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीची राजकीय धुळवड खाली बसल्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील फडके रोडवर तरुणाईमधील अपूर्व उत्साह, जोश आणि पारंपारिकतेबाबतचा जिव्हाळा याचे दर्शन घडले. परस्परांना दीपावलीच्या शुभेच्छा देतानाच सेल्फी काढणाऱ्या युवक-युवतींच्या चमूंनी पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात कधी ठेका धरला याचे भान त्यांनाही राहिले नाही.दरवर्षी फडके रोज तरुणाईचा उत्साही जल्लोष पाहायला मिळतो. सलवार-कुर्ता परिधान केलेले किंवा क्वचितप्रसंगी धोतरासारखे पारंपारिक वेश केलेले युवक आणि एरव्ही जीन्स टीशर्टमध्ये वावरणाऱ्या तरुणींनी अंगावर ल्यायलेल्या भरजरी साड्या किंवा अनेकविध पारंपारिक वेश, दागिने यामुळे विविधरंगांनी फडके रोडवरील वातावरण एखाद्या रंगीबेरंगी चित्रासारखे भासत होते.उपनगराकडे सरकलेल्या मराठी माणसांचे दिवाळी पहाटचे कार्यक्रम सध्या ठाणे, डोंबिवली या सांस्कृतिक पंढरीत रंगू लागले आहेत. डोंबिवलीतील अशा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा बुजुर्ग कानसेन आनंद लुटत असताना फडके रोडवर तरुणाईच्या एकसे एक कलागुणांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना थक्कच केले. महाराष्ट्राची शान असलेल्या पारंपारीक ढोल ताशांच्या तालावर अवघी तरुणाई थिरकत होती. मंगळवारी पहाटे साडेसहापासूनच या परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. आरंभ’ पथकासह ’संस्कृती आणि अन्य पथकांनी ढोल-ताशांच्या गजराने सारा आसमंत निनादून सोडला. ते बघण्यासाठी सांस्कृतिक उपराजधानीत युवकांसह अबालवृद्धांची तोबा गर्दी झाली होती.गणपती मंदिरात रांगा लावून आराध्य दैवत असलेल्या लाडक्या गणरायाचे दर्शन नागरिकांनी पहाटेच सहकुटुंब घेतले. त्यानंतर तरुणाईच्या कलाविष्काराचा आनंद लुटला. पारंपारीक पोषाखासह नवनव्या फॅशनच्या रंगीबेरंगी जथ्यामुळे विशिष्ट ग्रुप घोळक्याने उभे होते. मुला-मुलींनी केलेल्या नाना प्रकारच्या हेअरस्टाइलचीही घोळक्यात चर्चा होती. सकाळी दहानंतर अनेकांचे पालक फडके रोड परिसरात दाखल झाल्याने मित्र-मैत्रिणींच्या चमूंचे नंतर कौटुंबिक एकत्रिकरण झाले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी माजी शालेय विद्यार्थ्यांचे ग्रुप एकत्र येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांवरील मंडळीही तरुणाईचा हा सोहळा डोळ््यात साठवण्याकरिता जमतात. डोंबिवली ही कलावंतांची खाण असल्याने चॅनेल्समधील लोकप्रिय कलाकारांनीही फडके रोडवर पायधूळ झाडली. त्यांना पाहण्याकरिता शेकडो माना सहज वळत होत्या. येथील हॉटेल, चाट कॉर्नर्समध्ये पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती.