डोंबिवलीत पुन्हा एकदा रिऍक्टरचा स्फोट?; प्रचंड मोठ्या आवाजाने आसपासचे नागरिक हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:28 PM2020-08-03T17:28:50+5:302020-08-03T17:31:10+5:30

डोंबिवलीतील शहरी वस्तीच्या जवळ असलेल्या एमआयडीसीचा प्रश्न या स्फोटाच्या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे.

Reactor blast in Dombivli once again ?; The surrounding citizens were shaken by the loud noise | डोंबिवलीत पुन्हा एकदा रिऍक्टरचा स्फोट?; प्रचंड मोठ्या आवाजाने आसपासचे नागरिक हादरले

डोंबिवलीत पुन्हा एकदा रिऍक्टरचा स्फोट?; प्रचंड मोठ्या आवाजाने आसपासचे नागरिक हादरले

Next

डोंबिवली – शहरात पुन्हा एकदा एमआयडीसीमधील केमिकल कंपनींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंबिवलीएमआयडीसी फेज २ मधील अंबर केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोटाचा भयंकर आवाज आला, या स्फोटाच्या आवाजाने आसपासच्या परिसरातील नागरिक हादरले, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे पण स्फोटामुळे कंपनीचा काही भाग कोसळला.

डोंबिवलीतील शहरी वस्तीच्या जवळ असलेल्या एमआयडीसीचा प्रश्न या स्फोटाच्या निमित्ताने पुन्हा समोर आला आहे. वाढते प्रदूषण, गुलाबी रंगाचा पाऊस अशा घटनांमुळे याआधीच एमआयडीसीतील केमिकल कंपन्या येथून स्थलांतरित कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही एमआयडीसीला भेट देऊन येथील कंपन्या हलवण्याचे आदेश दिले होते.

Web Title: Reactor blast in Dombivli once again ?; The surrounding citizens were shaken by the loud noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.