सासूवर जावयाने केले वस्तऱ्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:07 IST2018-05-19T03:08:07+5:302018-05-19T05:07:40+5:30
मुलीचा छळ करणा-या जावयास जाब विचारण्यास गेलेल्या सासूच्या हातावर जावयाने वस्त-याने वार केला. ही घटना येथील शांतीनगर-पिराणीपाडा येथे घडली.

सासूवर जावयाने केले वस्तऱ्याने वार
भिवंडी : मुलीचा छळ करणा-या जावयास जाब विचारण्यास गेलेल्या सासूच्या हातावर जावयाने वस्त-याने वार केला. ही घटना येथील शांतीनगर-पिराणीपाडा येथे घडली. फिजा जाफरी असे जखमी सासूचे नाव असून तिची मुलगी जैनाब हिचे फिरदोस जाफरी याच्याबरोबर लग्न झाले आहे.
सासरचे लोक त्रास देतात, अशी तक्रार केल्याने मुलीची आई फिजा जाब विचारण्यासाठी गेली असता जाफर जाफरी आणि शबाना जाफरी यांनी तिचे केस पकडून ठोशाबुककयांनी मारहाण केली. तसेच आमच्याकडे तक्रार करू नको, तुझ्या मुलीला ठेव, अन्यथा कायमची माहेरी घेऊन जा, असे सांगितले. या झटापटीत जावई फिरदोस याने सासू फिजा हिच्या डाव्या हाताच्या मनगटावर वस्तºयाने वार केले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात फिजा जाफरी हिने तक्रार दाखल केली.