शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

भाताला शासनाने दिला जास्त भाव, रवींद्र चव्हाण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:53 IST

आघाडी सरकारच्या काळात भाताला प्रतिक्विंटलला ७५० रुपये भाव दिला जात होता. मात्र, भाजपा सरकारने एक हजार ७५० रुपयांचा भाव दिला आहे, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी येथे दिली.

डोंबिवली : आघाडी सरकारच्या काळात भाताला प्रतिक्विंटलला ७५० रुपये भाव दिला जात होता. मात्र, भाजपा सरकारने एक हजार ७५० रुपयांचा भाव दिला आहे, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी येथे दिली.राज्य सरकारच्या कृषी विभागाने डोंबिवलीतील क्रीडासंकुलात भरवलेल्या ‘कृषी महोत्सव २०१९’ चे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी झाले. याप्रसंगी महापौर विनीता राणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव, कृषी सहसंचालक विकास पाटील, आत्मा प्रकल्पाचे संचालक पी.एम. चांदवडे, कृषी अधिकारी अंकुश माने आदी मान्यवर उपस्थित होते.चव्हाण यांनी सांगितले की, ‘द्राक्षे उत्पादन करणारा नाशिकचा शेतकरी सधन आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकरीदेखील सधन झाला पाहिजे. झटपट पैसा मिळवण्याच्या नादात ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतजमीन विकू नये. शेतकºयांनी शेतीत काय उत्तम पिकू शकते, हे जाणून घेण्यासाठी कृषी अधिकाºयांमार्फत मुद्रा (सॉइल) कार्ड तयार केले पाहिजे. तसेच शेतीला पूरक असलेल्या जोडव्यवसायांकडेही वळले पाहिजे.’/चव्हाण पुढे म्हणाले की, ‘बाजारात गीर गायीच्या तुपाला जास्त किंमत मिळते. गीर गायींचे पालन करण्यासाठी सरकार पैसा देते. त्यामुळे पशुपालनाचा विचार जिल्ह्यातील शेतकºयांनी केला पाहिजे.’चव्हाण पुढे म्हणाले, ‘शेततळ्यासाठी सरकार अनुदान देते. त्या माध्यमातून शेततळे उभारल्यास त्यातून शेतीला पाणी मिळू शकते. तसेच शेततळ्यात मत्स्यशेतीही केली जाऊ शकते. बासा माशाला बाजारात चांगली मागणी आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये हा मासा खाल्ला जातो. त्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती करण्यावर भर दिला पाहिजे. खाडी परिसरातील शेतात कडधान्यांचे पीक घेता येऊ शकते. भातशेतीसह पशुपालन, फुलशेती, फळभाज्यांची शेती याकडे शेतकºयांनी वळल्यास त्यांना जोडधंदा मिळून त्यांच्या हाती पैसा येऊ शकतो. त्यातून तो सधन होऊ शकतो.’सहसंचालक पाटील म्हणाले, गटशेती योजनेच्या माध्यमातून एका गटाला शेतीसाठी एक कोटी रुपये दिले जातात. मागच्या व यंदाच्या वर्षी मिळून नऊ कोटी रुपयांचे अनुदान देण्यासाठी १४ गटांची निवड केली आहे. यांत्रिकीकरणासाठी शेतकºयांना दीड कोटी रुपयांचे वाटप केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाईपोटी २४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. भात आणि आंबा पीक विमा योजनेंतर्गत नुकसान झालेल्या पिकांसाठी अडीच कोटींची भरपाई दिली आहे.ठाणे जिल्ह्यातील शेतकरी भेंडीचे उत्पादन घेतात. निर्यात करण्याच्या दर्जाची भेंडी पिकवली जाते. एक हजार भेंडी पीक उत्पादकांची नोंदणी जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर फळबागांची ४५० हेक्टर जमिनीवर लागवड केली आहे. ठिबक व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिके घेतली जात आहेत, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांचा सत्कार : यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकरी दिलीप देशमुख, सुरेश भोईर, विनायक पोटे, विजया पोटे, लक्ष्मण पागी, कैलास बराड आदी ३१ शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. टिटवाळा येथील माँ जिजाऊ अपंग गट, घोटसईला तीन लाख ३१ हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.हळद, सेंद्रिय गूळ, औषधी वनस्पतीकृषी महोत्सव यापूर्वी ठाण्यात भरवला होता. डोंबिवलीत सरकारच्या पुढाकाराने प्रथमच तो होत आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत त्याला भेट देता येईल. महोत्सवात हळद, सेंद्रिय गूळ, कडधान्ये, विविध प्रकारचा तांदूळ, मिरगुंडे, औषधी वनस्पती विक्रीस असून त्यांचे १३५ स्टॉल्स आहेत.मंत्र्यांनी फिरवली पाठकृषी महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होते. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार होते. मात्र, या तिन्ही मंत्र्यांनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पाठ फिरवल्याने महोत्सवाचे उद्घाटन एक तास उशिराने झाले.ठाणे जिल्ह्यात खातेदार असलेल्या शेतकºयांची संख्या एक लाख ३२ हजार आहे. असे असताना उद्घाटनाच्या वेळी शेतकºयांची उपस्थिती कमी होती.दरम्यान, यावेळी भेंडी उत्पादक शेतकºयांनी राज्यमंत्री चव्हाण यांना भेंडीचा एक बॉक्स भेट दिला.

टॅग्स :thaneठाणे