उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन

By सदानंद नाईक | Updated: October 6, 2022 18:54 IST2022-10-06T18:53:38+5:302022-10-06T18:54:04+5:30

उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन करण्यात आले. 

Ravana was cremated at Ramlila Maidan on behalf of Century Rayon Company in Ulhasnagar  | उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन

उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन

उल्हासनगर : शहरातील शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या रामलिला मैदानात कंपनीच्या वतीने रावण दहन केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थित दसऱ्याला सायंकाळी झाले. यावेळी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. 

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या रामलिला मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम झाला असून केंद्रीयमंत्री कपिल पाटील, सेच्युरी रेयॉन कंपनीचे युनिट प्रमुख अपुर्व गुप्ता, श्रीकांत गोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेला हा रावण दहनाच्या कार्यक्रम यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा झाला. असी माहिती सेच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिली.


 

Web Title: Ravana was cremated at Ramlila Maidan on behalf of Century Rayon Company in Ulhasnagar