शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न केल्याने रहिवाशांचे रेशन झाले बंद, संतप्त रहिवासी धडकले रेशनिंग आॅफीसवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 4:14 PM

रेशनिंग कार्ड आधारला लिंक न केल्याने मागील कित्येक वर्षापासून ठाण्यातील झोपडपट्टी भागातील रहिवाशांना रेशनच मिळत नसल्याचा बाब समोर आली आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी सोमवारी वंदना येथील रेशनिंग आॅफीसवर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देरेशन मिळाले नाही तर दुकाने लुटण्यात येतीलआमदार जितेंद्र आव्हाडांनी दिला इशारा

ठाणे -आधारकार्ड रेशनींग कार्डला लिंक न  केल्याने ठाण्यातील अनेक रहिवाशांना रेशनदुकानावर राशनच मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रेशनिंग आॅफीसवर मोर्चा काढला होता. यावेळी गोरगरीब जनतेला रेशन मिळाले नाही तर दुकानच लुटली जातील असा इशारा आव्हाडांनी दिला.             सर्वच यंत्रणांना आधारकार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु या प्रक्रियेला पुन्हा जून पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असतांना देखील ठाण्यातील अनेक झोपडपट्टीभागातील रहिवाशांना आधारकार्ड लिंक केले नसल्याने रेशनच देण्याचे बंद करण्यात आल्याचा आरोप मोर्चेकर्त्यांनी केला आहे. एकीकडे केंद्र सरकारच्या अनेक धोरणामुंळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. भाववाढीने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले असतांना आता रेशनवरही या गोरगरीब जनतेला धान्य मिळत नसेल तर हा प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे मत यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आणि रेशनवर सर्व धान्य उपलब्ध व्हावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेशनिंग आॅफीसमध्ये सर्व्हर डाऊन असणे, नेटचा प्रॉब्लेम असणे आदींसह इतर समस्या असतांना विनाकारण नागरीकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु नागरीकांना रेशनिंग मिळावे असे आश्वासन यावेळी घेण्यात आले आहे. तरी देखील रेशनिंग उपलब्ध झाले नाही, तर मात्र रेशनिगंची दुकानेच लुटली जातील असा इशाराही यावेळी आव्हाडांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMorchaमोर्चा