स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:53 PM2018-04-09T15:53:59+5:302018-04-09T15:53:59+5:30

स्मशानभुमीच्या निमित्ताने सध्या ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. परंतु आता स्मशानभुमीच्या बाजूने तब्बल पाच रहिवाशांना रस्त्यावर उतरून सरनाईक यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

Vigorous power demonstration through cemetery | स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Next
ठळक मुद्देस्मशानभुमीच्या मागणीसाठी पाच रहिवासी रस्त्यावरलवकरच पाहणी दौरा केला जाणार

ठाणे - मागाली काही दिवसापासून स्मशानभुमीच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. परंतु सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी या स्मशानभुमीच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे पाच हजार रहिवासी सहभागी झाले होते. हा मोर्चा जरी नागरिकांचा असला तरी, या मोर्चाच्या माध्यमातून सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार शक्तीप्रदर्शन केले असल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.
                मागील काही महिन्यांपासून ठाण्यात स्मशानभुमीच्या मुद्यावर चांगलेच वादळ उठले आहे. परंतु आता हे वादळ एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये रंगत असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी विधिमंडळात उपस्थित केलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व टिकुजीनी वाडी येथील मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते नरेश म्हस्के व नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर या दोन्ही स्मशानभूमी संदर्भातील ठराव मंजुर झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्या अभियंत्यांनी या स्मशानभूमीसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.
       परंतु या स्मशानभूमीच्या आसपास बांधकाम चालु असलेल्या काही बिल्डरांचे लागेबांधे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबरोबर असल्याने या परिसरातील काही मुठभर रहिवांशाना हाताशी धरून काही नगरसेवक या स्मशानभूमीला विरोध करू लागले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. परंतु याच स्मशानभुमीला त्यांच्याच पक्षातील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी विरोध केल्याने स्मशानभुमीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हावाट्यावर  आला आहे.
        स्मशानभूमीच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी १० वाजता ठाणे महापालिका शाळा क्र .४७ वर्तक नगर ते महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे स्मशानभूमी बचाव समितीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वर्तकनगर येथून निघालेला मोर्चा दुपारी साडेबारा वाजता महापालिका मुख्यालयाच्या बाहेर आला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमवेत स्मशान बचाव समितीने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. समता नगर ते टिकुजिनीवाडी या परिसरात गेल्या ८ ते १० वर्षात अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या पट्ट्यात एकही स्मशानभूमी नाही. केवळ वागळेला स्मशानभूमी आहे. त्यामुळे स्मशानभूमीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. तर हा नागरिकांचा मोर्चा असून यात पक्षाचा काही संबंध नसल्याची प्रतिक्र या आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या १९ तारखेला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून निसर्ग उद्यान मुल्ला बाग येथील आरक्षित जागेचा पर्याय सुचवण्यात आला असून दोन महिन्यात स्मशानभूमीच्या कामाला सुरु वात करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे.



 

Web Title: Vigorous power demonstration through cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.