बदलापुरात चित्रसंगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:55+5:302021-09-07T04:47:55+5:30
३ ते ५ सप्टेंबर असे तीन दिवस हे चित्र प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्र संगीत या कार्यक्रमाद्वारे साकारण्यात आले. जुवाटकर हे ...

बदलापुरात चित्रसंगीतावर साकारले रतन टाटा यांचे चित्र
३ ते ५ सप्टेंबर असे तीन दिवस हे चित्र प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्र संगीत या कार्यक्रमाद्वारे साकारण्यात आले. जुवाटकर हे पाच वर्षांपासून चित्र-संगीत या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहेत. एकीकडे संगीताचा कार्यक्रम आणि दुसरीकडे चित्र रेखाटण्याचा अनोखा कार्यक्रम अशी वेगळी कल्पना जुवाटकर यांनी साकारली आहे. जुवाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देव-देवतांची चित्रे रेखाटली आहेत. जुवाटकर यांच्या चित्रसंगीत कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे ते कॅनव्हासवर चित्र साकारत असताना दुसरीकडे नृत्य, शास्त्रीय संगीत, गायन, आदी मनोरंजक कार्यक्रम सुरू असतात. यावर्षी त्यांनी रतन टाटा यांचे चार बाय पाच आकाराच्या कॅनव्हासवर चित्र साकारले आहे. बदलापूर पश्चिमेच्या यशस्विनी भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
------------