नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात राष्ट्र सेवा दलातर्फे 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 10:29 AM2017-11-06T10:29:22+5:302017-11-06T10:29:48+5:30

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर नोटाबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे कल्याणमध्ये 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 

Rashtra Seva Dal's 'black out' agitation against Note Ban | नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात राष्ट्र सेवा दलातर्फे 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात राष्ट्र सेवा दलातर्फे 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक

Next

कल्याण -  केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर नोटाबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे कल्याणमध्ये 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. काळ्या पैशाला आळा घालण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2016 ला केंद्र सरकारने नोटाबंदी निर्णयाची घोषण केली होती.  

मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेलाच प्रचंड त्रास सहन करावा लागला व यामुळे 120 जणांना नाहक जीव गमवावा लागल्याचीही माहिती समोर आली. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे येत्या बुधवारी 'ब्लॅक आऊट डे' आंदोलनाची हाक देण्यात आल्याची माहिती सुहास कोते यांनी दिली. या आंदोलनांतर्गत येत्या 8 तारखेला रात्री 8 वाजता आपापल्या घरातील आणि परिसरातील दिवे (लाईट) अर्धा तास बंद ठेऊन नोटाबंदीचा निषेध केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

देशातील नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, बँकेसमोरील रांगेत देशाच्या झालेल्या लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्याचे सांगत, नोटाबंदी निर्णयाविरोधात सर्वांनी 'ब्लॅक आउट' करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही राष्ट्र सेवा दलातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Rashtra Seva Dal's 'black out' agitation against Note Ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.