धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, नद्या ओव्हर फ्लो, सतर्कतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 04:38 AM2018-07-17T04:38:57+5:302018-07-17T04:39:07+5:30

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला.

Rapid increase in dam water supply, rivers overflow, alert alert | धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, नद्या ओव्हर फ्लो, सतर्कतेच्या सूचना

धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ, नद्या ओव्हर फ्लो, सतर्कतेच्या सूचना

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणीसाठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्याचे दोन दरवाजे उघडले असून, तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात ते भरण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस पडला असून, नद्या ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणीसाठाहोता. तो सोमवारी ६४ टक्के झाला. बारवी धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास ते भरण्याची शक्यता आहे. उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणात रात्रभरात चार टक्के साठा वाढला आहे. बदलापूर बंधारा धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तर मोहने बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
>विहार तलाव भरला
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलाव क्षेत्रावर पावसाची कृपादृष्टी कायम आहे़ यामुळे गेल्या दोन दिवसांत तब्बल सव्वादोन लाख दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ तुळशी, मोडकसागर पाठोपाठ सोमवारी सकाळी विहार तलावही भरून वाहू लागला़ तर तानसा तलावही लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे़विहार तलावातून रोज मुंबईला ११० दशलक्ष लीटर जलसाठा होतो़ शनिवारी तलावांमध्ये सात लाख दशलक्ष लीटर साठा होता़ यात वाढ होऊन नऊ लाख ३४ हजार दशलक्ष लीटर साठा झाला़ वर्षभर आवश्यक साठ्यापैकी ६४ टक्के साठा तलावांत आहे.
>कल्याण-नगर मार्ग बंद
उल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील रायता पुलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण-शीळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने, कल्याण-मुरबाड-नगर या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली, टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहत असल्याने, तेथील वाहतूकदेखील बंद केली आहे.ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासांत एक हजार ९६.२० मिमी पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी नोंद घेतली असून, आतापर्यंत ५११.८२ मिमी पाऊस झाला आहे. यात ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के, भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाऊस झाला आहे.

Web Title: Rapid increase in dam water supply, rivers overflow, alert alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण