क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत बलात्कार

By धीरज परब | Updated: February 18, 2024 19:55 IST2024-02-18T19:55:15+5:302024-02-18T19:55:22+5:30

मीरारोड - मीरारोडच्या कनकीया भागातील सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत, ३१ वर्षीय तरुणीस वाईन पाजून तिच्यावर बलात्कार केला नंतर ...

Raped asking for a birthday party in a club | क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत बलात्कार

क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत बलात्कार

मीरारोड - मीरारोडच्या कनकीया भागातील सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी करू सांगत, ३१ वर्षीय तरुणीस वाईन पाजून तिच्यावर बलात्कार केला नंतर लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा गुन्हा मीरारोड पोलिसांनी दाखल केला आहे . 

पीडित ३१ वर्षीय तरुणी ही विरार भागात राहणारी आहे. गुजरातच्या सुरत भागात राहणारा राजीव मायेडा ( ४० ) ह्याने तरुणीला सप्टेंबर २०२३ मध्ये तिच्या वाढदिवसाची पार्टी सेव्हन इलेव्हन क्लब मध्ये करू सांगत तिला वाईन पाजून नंतर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. नंतर त्याने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून  ३० नोव्हेम्बर २०२३ पर्यंत विरार, सुरत, चंदीगड, अंधेरी आदी भागात तिच्या सोबत शारीरिक संबंध केले.

इतकेच नव्हे तर व्यवसाय करण्यासाठीचे कारण देऊन मायेडा ह्याने तरुणी कडून ६ लाख रुपये घेतले व ते परत केले नाहीत. बलात्कार, फसवणूक आदी प्रकरणी मीरारोड पोलिसांनी १५ फेब्रुवारी रोजी तरुणीच्या फिर्यादी वरून मायेडा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष सांगवीकर हे पुढील तपास करत आहेत. 

 

Web Title: Raped asking for a birthday party in a club