मीरारोडमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 20:38 IST2018-05-29T20:38:48+5:302018-05-29T20:38:48+5:30
सदर मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन तो दुकान बंद झाल्यावर अत्याचार करत असे.

मीरारोडमध्ये १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
मीरारोड - एका १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा भार्इंदर पोलीसांनी दाखल करुन आरोपी तरुणास अटक केली आहे. आरोपी भार्इंदर येथील एका कपड्याच्या दुकानात काम करुन तेथेच रहात असे. सदर मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन तो दुकान बंद झाल्यावर अत्याचार करत असे. मुलीच्या कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी पाळत ठेऊन आरोपीला पकडुन दिले. बलात्कारासह पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
महाविद्यालयातील मैत्रीणीवर लग्नाच्या आमिषाने बलातर
लोकमत न्युज नेटवर्क
मीरारोड - लग्नाचे आमिष दाखवुन महाविद्यालयीन मैत्रिणीशी शारिरीक संबंध ठेवणारया व नंतर लग्नास नकार देत मारहाण करणारया इमरान अकिल खान (२३ ) रा. पठाणवाडी, मालाड याला काशिमीरा पोलीसांनी अटक केली आहे.
इमरान व पिडीत २२ वर्षाीय तरुणी गीता ( नाव बदलले आहे ) ची ओळख ही महाविद्यालयीन काळा पासुन असल्याने इमरानचे तरुणीच्या घरी येणंजाणं होतं. लग्नाचे आमिष दाखवुन इमरानने गीताशी शारिरीक संबंध ठेवले.
लग्न करुन स्वत:च स्वतंत्र घर घ्यायचं म्हणुन इमरानने गीताच्या आईला एक सदनिका विकायला लाऊन ४५ लाख रुपये घेतले होते. पण आपल्याशी लग्न न करता दुसरया तरुणीशी लग्न करुन इमरानने आपली फसवणुक तर केलीच शिवाय घेतलेले पैसे देखील तो देण्यास टाळाटाळ करु लागला असं गीताचे म्हणणं असल्याचे सुत्रांनी सांगीतले.
दरम्यान लग्नास नकार देतानाच पैसे देखील इमरान परत करत नव्हता. गेल्या वर्षी इमरानने दुसरया तरुणीशी लग्न केल्या नंतर देखील तो गीताला मारहाण करुन बळजबरी करत होता. इमरानच्या भितीने गीता ही त्याच्या पासुन लपुन राहु लागली. पण मागावर असलेल्या इमरानने गीताला शॅधून काढत तीच्या घरी पोहचला. तेथे त्याने तीला जबर मारहाण करत बळजबरी केली.
अखेर या प्रकरणी गीताने काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन इमरान याला अटक केली आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक क्रांती पाटील तपास करत आहेत.