दादोजीवर आता रणजी सामने

By Admin | Updated: April 1, 2016 03:07 IST2016-04-01T03:07:15+5:302016-04-01T03:07:15+5:30

शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामने खेळवण्यास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत, शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विकास

Ranji matches now in Dadojij | दादोजीवर आता रणजी सामने

दादोजीवर आता रणजी सामने

ठाणे : शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामने खेळवण्यास ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत, शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक विकास रेपाळे यांनी पाठपुरावा करून विशेष अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत हा मुद्दा लावून धरला होता. त्या विषयावर बोलताना पालिका आयुक्तांनी येत्या सर्वसाधारण सभेच्या आत या विषयावर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. तसेच येत्या हंगामात रणजी सामने दादोजीवर खेळवण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून दादोजी स्टेडियम उभे राहिले. आज याच क्र ीडांगणातून अनेक उदयोन्मुख क्रि केटपटू घडत आहेत. तर, शहराने आजवर अनेक क्रि केटपटू मुंबई आणि देशाला दिले आहेत. २० वर्षांपूर्वी मुंबई आणि सौराष्ट्र हा सामना दादोजीवर खेळवला गेला. मात्र, त्यानंतर आजवर एकही सामना या स्टेडियमवर खेळवला गेला नाही, हे दुर्दैव आहे. रणजी सामने ठाण्यात खेळवले गेले तर अनेक नामवंत खेळाडूंचे कौशल्य ठाण्यातील क्रि केटपटूंना जवळून पाहता येईल, अनुभवता येईल. त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. मात्र, दादोजीची खेळपट्टी आणि तशा सुविधा येथे उपलब्ध नसल्याने रणजी सामने खेळवले जाऊ शकत नाहीत, असे संबंधितांचे म्हणणे आहे. यासाठीच दादोजी स्टेडियम राष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी ठाणे महापालिका प्रशासन आणि मुंबई क्रि केट असोसिएशनकडे आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे रेपाळे यांनी सांगितले. स्टेडियमच्या विकासाबरोबरच स्टेडियममध्ये इनडोअर क्रि केट कक्ष तयार करावा, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे.
आजवर दादोजी कोंडदेव स्टेडियमकडे आपण पांढरा हत्ती म्हणून पाहिले आहे. स्टेडियममध्ये रणजी/आयपीएलचे सामने व्हावेत, ही ठाणेकर क्र ीडाप्रेमींची इच्छा आहे. त्याकरिता, मैदानाची दुरवस्था दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातच स्टेडियम विकासाची फाइल बनवून तयार आहे. परंतु, आर्थिक तरतुदीअभावी काम होत नसल्याचे त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर शहरातील क्र ीडापटूंचे, युवकांचे तसेच क्र ीडा रसिकांचे आपण काहीतरी देणे लागतो, हे विसरून चालणार नाही आणि त्यासाठीच तातडीने हे प्रकरण मंजूर करावे, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर, आयुक्तांनी रणजी सामने खेळवण्याचे प्रयत्न राहिले, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Ranji matches now in Dadojij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.