शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळेना! ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांना अमराठी पोलीस अधिका-याकडून कोठडीत बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 12:44 IST

फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे

ठळक मुद्देमनसेला ज्या ठिकाणी सभा घ्यायची आहे तो वर्दळीचा रस्ता आहे.एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर चर्चगेट स्थानकाजवळ सभा आयोजित करायला राज यांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

मुंबई - फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. मनसेला ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळील अशोक टॉकीज किंवा तलावपाळी मार्गावर सभा आयोजित करायची आहे. मात्र रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली आहे. 

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शासकीय कार्यालये आहेत. मनसेला ज्या ठिकाणी सभा घ्यायची आहे तो वर्दळीचा रस्ता आहे.  या ठिकाणी सभेला परवानगी दिल्यास वाहतूक कोंडी निर्माण होईल म्हणून पोलिसांनी इथे सभेला परवानगी नाकारली आहे. एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर चर्चगेट स्थानकाजवळ सभा आयोजित करायला राज यांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मनसेने इथे सभा आणि मोर्चा आयोजित केला होता. त्याचवेळी राज यांनी फेरीवाल्यांना 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर मुंबई, ठाणे परिसरात मनसेने फेरीवाल्यांना हुस्कावून लावायला सुरुवात केली. 

स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी अविनाश जाधव यांना व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिका-याने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली. 

त्यानंतर, फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरिता जाधव यांच्याकडे प्रारंभी एक कोटींच्या जामीनदाराची मागणी करणारी नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली होती. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे