शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: जितेंद्र आव्हाड ही मुंब्राची म्हैस, महाराष्ट्र सैनिकांना डिवचू नका - संदीप देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:34 IST

निवडणुकीपूर्वी युती एकाची आणि निकालानंतर दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसला हा इतिहास तुमचा आहे असा टोला संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना लगावला.

ठाणे –  मुंब्राची म्हैस, जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगतात दंगल भडकवू नका. तू आम्हाला शिकवणार? तुम्ही काय काय धंदे केलेत. इशरत जहांला पाठिंबा देणारे तुम्ही, अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणून रडणारे तुम्ही. आम्ही सगळे प्रभू श्री रामचंद्रांचे सैनिक आहोत. आमच्या शेपटीला आग लावाल तर तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देत समोरासमोर या, भ्याड लोकं रात्रीच्या अंधारात काय येता? महाराष्ट्र सैनिकांना आव्हान देऊ नका असं आव्हान दिले आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, २ एप्रिलला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर न भूतो न भविष्य अशी राज ठाकरेंची सभा झाली. या सभेवर महाराष्ट्राचं लक्ष होतं. या सभेत प्रखर आणि परखड विचार राज ठाकरेंनी मांडले. त्यामुळे बरेच लोकं घायाळ झाले. ज्यांना इतिहास माहिती नाही ते पुण्याईवर जगणारे लोकं बोलायला लागले. शिवसेनेचा इतिहास तपासून घ्या. याच शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जायचं. आता शरद सेना असा प्रवास झालाय. त्यांनी आमच्याबाबत बोलू नये. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची बी टीम आहे. डोळा एकाला मारला, प्रेम एकावर केलं, लग्न एकासोबत केले आणि हनीमून चौथ्यासोबत केले. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती ठामच घेतली आहे असा टोला आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

तसेच निवडणुकीपूर्वी युती एकाची आणि निकालानंतर दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसला हा इतिहास तुमचा आहे. शिवसेना ढ टीम आहे. रामनवमीदिवशी रामरथ मनसेने तयार केला. गडकरी चौकात रामरथाचं पूजन केले. उद्धाटन केले. त्यानंतर हा रामरथ सगळीकडे फिरणार होता. तर आमच्या मनसेच्या विभाग अध्यक्षांपासून कार्यकर्त्यांना अटक केली. पोलीस सांगतात शिवसेनेला डिवचण्यासाठी तुम्ही हनुमान चालीसा लावली. हनुमान चालीसा लावल्यामुळे शिवसेना कधीपासून डिवचायला लागली? हे खरे असेल भगवा रंग शिवसेनेने बाजूला ठेवावा. मनसे संपली नाही तर बाळासाहेबांचे विचार तुम्ही संपवायला निघाले आहेत असा आरोपही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड