शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

विधानसभा लढवण्याबाबत राज ठाकरे यांची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 01:07 IST

डोंबिवली दौऱ्यावर : मान्यवर, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा

अनिकेत घमंडी डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी डोंबिवलीच्या दौºयावर असून ते येती विधानसभा निवडणूक ईव्हीएम मशिनद्वारे घेतली तर ती लढवायची किंवा कसे याबाबत शहरातील मान्यवरांशी चर्चा करणार असल्याचे समजते. शनिवारी सकाळी पुण्याहून ते निघणार असून थेट डोंबिवलीत येतील अशी माहिती पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली. बदलापूर पाइपलाइन मार्गावरील कुशाला हॉटेलमध्ये ते उतरणार असून तेथेच दोन दिवस वास्तव्याला आहेत. दोन दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका स्तरावरील नगरसेवक, पदाधिकाºयांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच शहरातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे सांगण्यात आले. एका खासगी कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राज यांच्या प्रचाराचा भाजपच्या यशावर फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर राज यांनी ईव्हीएम मशिनच्या विरोधात मोहीम सुरु केली. निवडणूक आयोगाकडे मतपेटीद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली. त्याचबरोबर या मुद्द्यावर जनमत तयार करण्याकरिता ममता बॅनर्जी यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांची भेट घेतली. मात्र निवडणूक आयोग आपली मागणी मान्य करणार नाही हे लक्षात आल्यावर राज यांनी निवडणूक जर फिक्स असेल तर कशाला लढवायची, असे सूचक विधान अलीकडेच पक्षाच्या मेळाव्यात करुन विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते.

राज हे सातत्याने घेत असलेल्या सरकार विरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच ईडीच्या चौकशीला त्यांना सामोरे जावे लागले. पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनाही ईडीने चौकशीला बोलावले. युती तुटली तर शिवसेनेला रोखण्याकरिता मनसेचे उमेदवार रिंगणात असणे ही भाजपची गरज असू शकते. समजा युती झाली तरीही शिवसेनेला मागील वेळी युती तुटल्याचा लाभ झाला तसा तो होऊ नये याकरिता मनसे फॅक्टर भाजपच्या कामी येऊ शकतो. राज यांनी भाजपवर टीका करताना शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवली तर त्यांच्या मागे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ठ थांबू शकते. त्यामुळे भाजप विरोधाची धार कमी न करता राज यांनी भाजपला अनुकूल राजकीय खेळी खेळावी, अशी भाजपच्या चाणक्यांची इच्छा असल्याचे कळते. भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेल्या एका नेत्याने निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राज यांच्यापुढे ठेवल्याचे समजते.भाजपवर तोंडसूख घेत असलेल्या राज यांनी शिवसेनेला अपशकुन करण्याची फारशी उत्सुकता दाखवली नव्हती, असे कळते. त्यानंतरच चौकशीचे लचांड त्यांच्या मागे लागले, असे मनसेच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. लोकसभेला ‘इस बार ३०० पार’ अशी घोषणा केलेल्या भाजपला विधानसभेत स्वबळावर २०० जागा मिळवायच्या आहेत. तसे झाल्यास शिवसेनेचा खोकला सुंठीवाचून जाणार आहे. त्यामुळे या यशाकरिता सर्व शक्यता भाजप अजमावत आहे, असे भाजपच्याच एका नेत्याने खासगीत सांगितले. राज हे समाजातील मान्यवर व पदाधिकारी यांची मते जाणून घेणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे