पैशांचा पाऊस पाडणारा भोंदू अटकेत

By Admin | Updated: April 14, 2016 00:16 IST2016-04-14T00:16:14+5:302016-04-14T00:16:14+5:30

एका महिलेस पाच कोटी मिळवून देतो, असे सांगून तिला सव्वासात लाखांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे.

The rainfed hawk caught | पैशांचा पाऊस पाडणारा भोंदू अटकेत

पैशांचा पाऊस पाडणारा भोंदू अटकेत

मीरा रोड : एका महिलेस पाच कोटी मिळवून देतो, असे सांगून तिला सव्वासात लाखांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे.
भार्इंदर पश्चिमेला राहणाऱ्या तेजल वखारिया यांची दोन ते तीन महिन्यांपूर्वी स्वत:ला जैन मुनी म्हणवणाऱ्या सुयश प्रभाकर (४८) याच्याशी जेसल पार्क जैन मंदिरात ओळख झाली. त्या वेळी सुयशने तेजल यांच्याकडून देणगी मागितली असता सध्या आपली आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शक्य नसल्याचे सांगितले. परंतु, सुयशने तेजल यांना मला दैवी शक्ती प्राप्त असून तुम्हाला पाच कोटींचा पाऊस पाडून देईन, असे सांगितले. मात्र, त्यासाठी पूजा करावी लागेल व खर्च होईल, असे सांगत आधी एक लाख ३० हजार उकळले. त्यानंतर, आणखी सहा लाख सुयशने तेजल यांच्याकडून घेतले. त्यानंतर, मात्र सुयश पैसे देत नसल्याने तेजल यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला. मात्र, तेव्हापासून सुयश दिसेनासा झाला. (प्रतिनिधी)

Web Title: The rainfed hawk caught