शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

पावसामुळे तरुणाईचा कल टेम्पररी टॅटूकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:06 IST

नवरात्रोत्सवामुळे फॅड वाढले : मुलांमध्ये नावाच्या, तर मुलींमध्ये राधा - कृष्णाची क्रेझ

ठाणे : नवरात्रोत्सवात अंगावर टॅटू काढण्याचे फॅड वाढतच आहे. सौंदर्यात भर पाडण्यासाठी हल्ली टॅटूकडे तरुणाईचा जास्त कल आहे. गरबा खेळायला येणारे तरुण, तरुणी हमखास टॅटू काढून घेतात. कायमस्वरुपी काढण्यात येणाऱ्या टॅटूला सुकण्यास वेळ लागत असल्याने, तात्पुरत्या टॅटू काढण्याला तरुणाईने पसंती दिली आहे. गेल्यावर्षी या उत्सवाच्या निमित्ताने भूमिती आकाराच्या टॅटूची क्रेझ होती. यावर्षी मुलींमध्ये राधा - कृष्ण, तर मुलांमध्ये नावांच्या टॅटूची क्रेझ असल्याचे टॅटू आर्टिस्टने सांगितले.तरुणाईच्या पेहरावाबरोबर सौंदर्याला ग्लॅमर देणाºया टॅटूचे फॅड नवरात्रीत वाढले असल्याचे अलिकडे पाहायला मिळत आहे. आपल्या पेहरावाबरोबर सौंदर्यही चारचौघांत खुलून दिसावे, यासाठी गरबाप्रेमींची आठवडाभर धावपळ सुरू असते. यात अंगावर गोंदवून घेणे हा प्रकार भारतात जुना असला तरी, याच्या मेकओव्हरमुळे ग्लॅमर प्राप्त झाले आणि हा प्रकार ‘टॅटू’ म्हणून सर्वश्रूत झाला. दरवर्षी वेगवेगळ्या टॅटूची क्रेझ तरुणाईमध्ये दिसून येते. परंतू पावसामुळे तात्पुरत्या टॅटू काढण्याकडे तरुण वर्ग वळला आहे. कायमस्वरुपी टॅटू सुकायला १० ते १५ दिवस लागतात. पण गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे वातावरणात थंडावा असल्याने कायमस्वरुपी टॅटू सुकणे कठिण आहे. त्यात अवघे सहा दिवस राहिल्याने तरुणाईने तात्पुरत्या टॅटू काढण्यालाच पसंती दिली आहे. आठवडाभरावर हा उत्सव आल्याने गरबाप्रेमींनी आपल्या मनपसंतीचे टॅटू काढून घेण्यास सुरूवात केली आहे. या काळात गर्दी असल्याने आगाऊ नोंदणी टॅटू आर्टीस्टकडे केली जात आहे. मुली फुलपाखरु, एंजल याबरोबर राधा - कृष्णा, बासरी काढून घेत आहेत. मुलांमध्ये नावांचे टॅटू काढण्याची क्रेझ असल्याचे टॅटू आर्टीस्टने सांगितले.तात्पुरत्या टॅटूमध्ये हल्ली ग्लिटर लावण्याची क्रेझ आहे. ग्लिटरमुळे टॅटू चमकतो आणि उठून दिसतो असे निरीक्षण टॅटू आर्टीस्ट प्रसाद निवाते याने नोंदविले.नवरात्रीत टॅटू नजरेस पडेल, अशाच भागांवर काढला जातो. पाठ, गळा, दंड या शरीराच्या भागांवर टॅटू काढला जातो. त्यात मनगट ते कोपर या भागांवर टॅटू काढण्याचे प्रमाण अधिक आहे.नऊ दिवस नऊ प्रकारांचे टॅटू काढण्यालाही तरुणांची पसंती आहे. नऊ रंगांनुसार त्यात्या रंगांचे त्यात्या दिवशी टॅटू काढले जातात.पावसामुळे टॅटूची क्रेझ कमी झालेली दिसत आहे. पावसामुळे नोकरदार तरुणाईला कायमस्वरुपी टॅटूची काळजी घेणे अशक्य असल्याने इच्छुकांनी तात्पुरत्याच टॅटूला पसंती दिली आहे.- प्रसाद निवातेनवरात्रीत देवीचा मंत्रदेखील काढला जातो. सध्या पावसामुळे टॅटू सुकण्यास अडचण होत आहे.- ओमकार निकार्गे