शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, पालघरलाही पावसाने झोडपले  

By अजित मांडके | Updated: May 6, 2025 22:01 IST

Thane Rain News: उकाड्याने हेराण झालेल्या ठाणेकरांना मंगळवारी रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा चांगलाच तडका बसला. रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला आणि पावसाला सुरवात झाली.

- अजित मांडके ठाणे - उकाड्याने हेराण झालेल्या ठाणेकरांना मंगळवारी रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा चांगलाच तडका बसला. रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला आणि पावसाला सुरवात झाली.

मंगळवारी दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र रात्री 8 नंतर वातरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर पावसाच्या सरी सुद्धा बरसण्यास सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तर या पावसामुळे शहरातील घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ, आनंद नगर, मानपाडा आदींसह शहरातील इतर भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच वाऱ्यामुळे शहरातील काही भागात वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. अवघ्या ५ ते १० मिनिटे विजांचा कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.

पालघरलाही मुसळधार पावसाने झोडपलेपालघर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आहे. विजांसह पावसालाही सुरुवात झाली, तर जव्हार तालुक्यात साडेआठच्या  सुमारास मोठ्या प्रमाणावर विजा, वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. जव्हार गंजाड मार्गावरील वीजवाहिनी बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणेpalgharपालघर