शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

ठाणे जिल्ह्यातील २२ लाख चाकरमान्यांची रेल्वेकडून उपेक्षा; लॉकडाऊनच्या संधीचं सोनं केलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 2:27 AM

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१२ पासून कागदावरच 

अनिकेत घमंडीडोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनाला २०१२ पासून सुरू असलेले अनेक प्रकल्प दशकअखेर पूर्ण करून २२ लाख चाकरमानी असलेल्या ठाणे जिल्ह्याला दिलासा देता आलेला नाही. त्यात प्रामुख्याने पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गासह कळवा-ऐरोली लिंक रोडच्या कामाचा समावेश आहे. रेल्वे सेवेवरील ताण हे काही प्रकल्प पूर्ण न होण्याचे कारण दिले जात होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये उपनगरीय रेल्वे सेवा बंद असल्याचा लाभ घेऊन रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करणे शक्य होते. मात्र ती संधी रेल्वे प्रशासनाने गमावली आहे.

‘नेमेची येतो मग पावसाळा’ यासारखेच आगामी वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या तोंडावर आतापर्यंतच्या प्रकल्पांचा आढावा घेता प्रवाशांच्या पदरी केवळ निराशाच येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून भारतभर रेल्वे बंद झाली. सामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी उपनगरीय लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मुंबई परिसरात सुरू झाली असली तरीही गेले आठ महिने राज्य, केंद्र, रेल्वे प्रशासन यांच्यातील वैचारिक संघर्षात सामान्यांना मात्र २६ जानेवारीपर्यंत लोकल सेवा सुरू झालेली नाही. हजारो नागरिकांना वेळखाऊ रस्ते वाहतुकीच्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीही रखडलेले प्रकल्प मार्गी लागलेले नाहीत. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन या संस्थेसह रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पण दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असल्याने संवादाच्या अभावी प्रवाशांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याचे वास्तव आहे.             

रेल्वेद्वारे ‘मालवाहतूक’ सुरू असल्याने २३ मार्च ते १७ डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगन्समधून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतूक व १.७६ लाख टन पार्सल वस्तूंची वाहतूक केली. त्यामध्ये भिवंडी रोड येथील गुड्पार्सल या नव्या प्रकल्पाचे योगदान विशेष उल्लेखनीय असल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे प्रवासी नसले तरी रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसलेला नाही.

गर्दी विभागण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल नाहीचसुमारे ४२५ कोटी रुपये खर्चाचा बदलापूर, टिटवाळा येथून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या १५ डबा लोकलचा प्रस्ताव रेल्वे दरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोपर, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची कामे रेंगाळलेली आहेत. २०१२ मध्ये माजी खासदार आनंद परांजपेंच्या मागणीने सुरू झालेल्या लोकल फेरीत ८ वर्षात अवघा एक रेक वाढवण्यात आला.

पाचव्या-सहावा ट्रॅक कधी पूर्ण होणार?ठाणे-दिवा पाचवी-सहावी लाइन  २०१४ पासून खोळंबलेली असल्याने कल्याण-ठाणे भागात चाकरमान्यांच्या लोकलमधील गर्दीमुळे पडून अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच या पट्ट्यात रूळ ओलांडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही चिंताजनक आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या