शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Proud of You! चिमुकल्याला जीवदान देणाऱ्या मयूर शेळकेचा रेल्वेमंत्र्यांकडून गौरव; अतुलनीय धाडसाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 15:12 IST

अवघ्या सेकंदानं मृत्यूला हुलकावणी; रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे, धाडसामुळे चिमुकला वाचला

ठळक मुद्देअवघ्या सेकंदानं मृत्यूला हुलकावणी; रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे, धाडसामुळे चिमुकला वाचलारेल्वेमंत्र्यांनी केलं शेळके यांचं कौतुक

भारतीय रेल्वेत पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेल्या मयूर शेळके यांनी प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. शेळके यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीदेखील त्यांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांच्यावर आपल्याला अभिमान असल्याचं म्हटलं. "आज रेल्वेमॅन मयूर शेळ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या धाडसाचं आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. संपूर्ण रेल्वे कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे. एका लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात टाकला. मला रेल्वेकडून खुप काही मिळालं आहे. मी केवळ माझी जबाबदारी पार पाडली असं त्यांनी सांगितलं," अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली. "त्यांच्या या शौर्याची आणि कामाची कोणत्याही पुरस्काराशी किंवा पैशाशी तुलना केली जाऊ शकत नाही. परंतु आपलं कर्तव्य पार पाडणं आणि आपल्या कामातून मानवतेबद्दल प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचा नक्कीच गौरव केला जाईल," असं गोयल म्हणाले. काय आहे विषय? रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या धाडसाचा अभिमान वाटत असल्याचं ट्वीट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोन दिवसांपूर्वी घडलेला संपूर्ण थरार सांगितला. 'शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी मी कामावर होतो. त्यावेळी एक अंध महिला तिच्या मुलीला घेऊन फलाटावरून चालत होती. तिच्या नकळत तो मुलगा फलाटावरून खाली पडला. त्यावेळी समोरून एक्स्प्रेस येत होती. मुलाला वाचवणं गरजेचं आहे असा निर्धार मी मनाशी केला आणि जीवाची बाजी लावली. त्यानंतर मी लगेचच मुलाच्या दिशेनं धावत सुटलो,' असं शेळके यांनी सांगितलं. रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोन दिवसांपूर्वी घडलेला संपूर्ण थरार सांगितला.'शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी मी ड्युटीवर होतो. त्यावेळी एक अंध महिला तिच्या मुलीला घेऊन फलाटावरून चालत होती. तिच्या नकळत तो मुलगा फलाटावरून खाली पडला. त्यावेळी समोरून एक्स्प्रेस येत होती. मुलाला वाचवणं गरजेचं आहे असा निर्धार मी मनाशी केला आणि जिवाची बाजी लावली. त्यानंतर मी लगेचच मुलाच्या दिशेनं धावत सुटलो,' असं शेळके यांनी सांगितलं. 

टॅग्स :thaneठाणेpiyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वे