भिवंडीत लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर छापा

By नितीन पंडित | Updated: February 19, 2024 19:32 IST2024-02-19T19:32:34+5:302024-02-19T19:32:58+5:30

३५ जणांविरोधात गुन्हा दाखल.

Raids on Ladies Bar in Bhiwandi | भिवंडीत लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर छापा

भिवंडीत लेडीज ऑर्केस्ट्रा बारवर छापा

भिवंडी :  कोनगाव पोलिस ठाणे हद्दीत रांजनोली येथे सुरू असलेल्या सिरोज ऑर्केस्ट्रा बार वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अश्लील हावभाव करणाऱ्या १२ बारबालांसह १७ ग्राहक व बार मधील कर्मचारी अशा एकूण ३५ जणांविरोधात  प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर रांजणोली नाका येथे सिरोज ऑर्केस्ट्रा बार असून तेथे बार व्यवस्थापक अरुण माडा,कशियर शेख रेहमान अर्शद हसन साहेब व चार पुरुष वेटर्स यांनी आपसांत संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता १७ मद्यापी ग्राहकांसमोर  बार मधील १२ बारबाला ग्राहकांजवळ अश्लिल वर्तन करीत असतांना मिळून आले म्हणून कोनगाव पोलिसांनी कारवाई करीत या विरोधात गुन्हा दाखल करून नोटीस बजावून सर्वांना सोडून देण्यात आले.

Web Title: Raids on Ladies Bar in Bhiwandi