गुजरात निवडणुकीमुळे राहुल गांधी भिवंडी न्यायालयात गैरहजर, RSS विरोधी केलं होतं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 18:41 IST2017-10-27T18:30:59+5:302017-10-27T18:41:05+5:30
भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे

गुजरात निवडणुकीमुळे राहुल गांधी भिवंडी न्यायालयात गैरहजर, RSS विरोधी केलं होतं वक्तव्य
भिवंडी : भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकेप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यांच्या वकिलांनी मुदतीचा अर्ज कोर्टासमोर सादर केला होता. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार आहे.
राहूल गांधी पक्षाच्या कामात व्यस्त असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही,अशी माहिती त्यांच्या वकिलांनी यावेळी कोर्टात दिली.
लोकसभा निवडणूक प्रचार काळात झालेल्या सभेत महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली,असे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. त्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असुन केवळ वृत्तपत्राच्या कात्रणावरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपुर्ण कागदपत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने यापुर्वी याचिकाकर्त्यांना दिले आहेत.
दरम्यान गुजरातच्या निवडणूकी दरम्यान राहूल गांधी व्यस्त असल्याने पुढील सुनावणी १७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.