सरचिटणीसपदी राहुल चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:35 IST2021-05-03T04:35:18+5:302021-05-03T04:35:18+5:30

-------------------------------------- ‘पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड केंद्र उभारावे’ कल्याण : ठाणे शहर पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक स्वतंत्र अद्ययावत कोविड उपचार ...

Rahul Chaudhary as General Secretary | सरचिटणीसपदी राहुल चौधरी

सरचिटणीसपदी राहुल चौधरी

--------------------------------------

‘पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड केंद्र उभारावे’

कल्याण : ठाणे शहर पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक स्वतंत्र अद्ययावत कोविड उपचार केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी कल्याणमधील मानव सहायक सेवा संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड आणि सचिव अम्मार काझी यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम करीत आहेत, याकडे संस्थेने लक्ष वेधले आहे.

----------------------------------

अखेर झाकणे बसवली

डोंबिवली : येथील पूर्वेतील नेहरू मैदानालगतचा पांचाळ गल्लीतील रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रिटचे काम करण्यात आले. पण ते काही ठिकाणी अर्धवट स्थितीत राहिले आहे. गटारांवर झाकणे टाकण्यात आलेली नसून काही ठिकाणी खड्ड्यांची स्थिती झाल्याने त्यात वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबतचे वृत्त २८ एप्रिलच्या लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. याची दखल तत्काळ घेत मनपा प्रशासनाने गटारांवर झाकणे बसविल्याने संभाव्य अपघात टळला असून स्थानिक नागरिकांनी लोकमतचे आभार मानले आहेत.

--------------------------------------------

फोटो आहे

Web Title: Rahul Chaudhary as General Secretary