शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना प्रवेश नाकारल्याने पालिकेत राडा

By admin | Updated: August 31, 2016 03:05 IST

दिवसभर पालिकेत सुरू असलेला राबता रोखत अधिकाऱ्यांना कामासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी नागरिकांना अवघा एक तास प्रवेश देण्यास सुरूवात केल्याने सुरूवात

भाईंदर : दिवसभर पालिकेत सुरू असलेला राबता रोखत अधिकाऱ्यांना कामासाठी पुरेसा वेळ देण्यासाठी नागरिकांना अवघा एक तास प्रवेश देण्यास सुरूवात केल्याने सुरूवात केल्याने सोमवारी भाईंदर पालिकेत राडा झाला. इतर वेळेत खु्द्द सभापतींनाच अडवण्यात आल्याने त्यांनी कारभारावर टीकास्त्र सोडले. मीरा-भार्इंदर पालिकेने दुपारी २.३० ते ३.३० याखेरीज इतर वेळेत मुख्यालयात येणाऱ्यांना रोखण्यासाठी सोमवारपासून प्रवेशद्वारच बंद केल्याने काँग्रेसचे प्रभाग पाचमधील सभापती प्रमोद सामंत यांनी प्रवेशद्वाराजवळ गोंधळ घातला. उपद्व्यापी लोकांमुळे त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी मोकळा वेळ मिळावा, तसेच सतत ये-जा करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी नागरिकांना मुख्यालयात मर्यादित वेळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. यावर काहूर उठल्यावर नाराजांना पूर्णवेळ प्रवेश मंजुुर करण्यात आला. त्यावर कोणीही ब्र काढला नाही. यानंतर मुख्य प्रवेशद्वारासह प्रत्येक मजल्यावरील प्रवेशद्वाराजवळ बायोमेट्रिक हजेरीसाठी थम्ब इंम्प्रेशन यंत्रे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली. ते पूर्ण होताच काही काळ निश्चित वेळेतील प्रवेश सुरु झाला. मात्र सोमवारपासुन अचानक मुख्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात निश्चित वेळेखेरीज बंद करण्यात आले. सामान्य नागरिकांना मुख्यालयाच्या आवारातच थोपवून धरण्यास आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यास सुरुवात झाली. कर भरणाऱ्यांना तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्रात, तर अर्ज देणाऱ्यांची मुख्यालयाबाहेर सोय करण्यात आली. प्रवेशद्वारच बंद झाल्याने काहींनी संताप व्यक्त केला. त्यातच प्रभाग सभापती प्रमोद सामंत दुपारी साडेतीननंतर मुख्यालयात आले असता त्यांना मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यातच आत जाण्यापासून रोखण्यात आले. सुरक्षारक्षकांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे लक्षात येताच सामंत यांनी प्रवेशद्वाराजवळच राडा केला. युतीतील सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातुन प्रशासनाने हुकुमशाही सुरु केल्याचा आरोप केला. संतप्त सामंत यांनी महापौर गीता जैन यांची भेट घेत प्रशासनाची मुजोरी वाढल्याचे निदर्शनास आणले. मात्र महापौरांनी यावर प्रशासनाची बाजू घेत थातुर-मातुर उत्तर दिल्याचे सामंत यांनी सांगितले. महापौरांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. (प्रतिनिधी)