शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस ऐवजी दिली रेबीजची लस; डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 17:47 IST

Suspension action on doctors and nurses : या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे.

ठळक मुद्देठाणे महापालिका मागील काही महिन्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन महिन्यापूर्वी एका महिलेला एकाच वेळेस कोरोना लसीचे तीन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.या घटना ताज्या असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ठाणे  : कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागात कोरोना लसीकरण सुरु असतांना एका व्यक्तीला कोरोना लसी ऐवजी रेबीज लस दिली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर मंगळवारी दुपारी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेच्या वतीने येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई केली आहे.       

ठाणे  महापालिका मागील काही महिन्यापासून या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन महिन्यापूर्वी एका महिलेला एकाच वेळेस कोरोना लसीचे तीन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लस घेतली नसतांना एका जेष्ठ नागरीकाला दुसरी लस घेतल्याचा मेसेज मोबाइलवर आला होता. तसेच लसीकरणातही भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करीत भाजपने पालिकेवर टिका केली होती.       

दरम्यान या घटना ताज्या असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कळव्यातील आतकोनेश्वर नगर भागातील महापालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांना माहिती होताच, त्यांनी मंगळवारी या संदर्भात आपल्या दालनात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कान उघाडणी केली. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पालिकेची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली. दरम्यान ज्या व्यक्तीला रेबीजची लस देण्यात आली आहे. त्याची प्रकृती उत्तम असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाsuspensionनिलंबनcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर