शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाल्याने शाळेची मान्यता रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 04:29 IST

किडीज् पॅराडाईज : शाळेतील विद्यार्थ्यांना इतरत्र सामावून घेणार

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान यंदाही प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात मुंब्रा येथील किडीज् पॅराडाईज इंग्लिश शाळेवर अखेर ठपका ठेवण्यात आला असून शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा सोमवारी राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने केली. ही कारवाई करताना शाळेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांना इतरत्र समावून घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल झाल्याचे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी पोलिसांनी केलेल्या तपासाअंती मुंब्रा येथील किडीज् पॅराडाईज इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजवर ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बोर्डातर्फे समिती स्थापन करण्यात आली होती. अखेर या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही शाळा दोषी आढळून आली असून शाळेवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीनुसार किडीज् पॅराडाईज इंग्लिश हायस्कूलची मान्यता शैक्षणिक वर्ष २०१८-१९पासून काढून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी हा निर्णय जाहीर केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. याबाबत शिक्षण उपसंचालकांना लवकर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आले आहे.कारवाई नियमानुसारच्डॉ. बोरसे म्हणाले, बोर्डाने नियमानुसार कारवाई केली आहे. ही कारवाई करताना त्या शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांची व्यवस्था नजीकच्या शाळा आणि महाविद्यालयांत करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपSchoolशाळाthaneठाणे