गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार - संजय पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 09:42 PM2020-01-09T21:42:45+5:302020-01-09T22:05:22+5:30

गृहरक्षक दलाच्या जवानांच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी ग्वाही गृहरक्षक दलाचे ठाणे जिल्हा समादेशक संजय पाटील यांनी गृहरक्षक दलाच्या त्रैमासिक संमेलनप्रसंगी ठाण्यात दिली. यावेळी उत्कृष्ठ कामगिरी बजावणाºया ३३ जवानांचाही सत्कार करण्यात आला.

 The question of salary the Home Guard personnel will soon be resolved - Sanjay Patil | गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार - संजय पाटील

प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या ३३ जवानांचा गौरव

googlenewsNext
ठळक मुद्देप्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या ३३ जवानांचा गौरवठाण्यात झाले त्रैमासिक संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून गृहरक्षक दलाच्या जवानांचे मानधन काही तांत्रिक कारणामुळे रखडले आहे. आता लवकरच हा मानधनाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही गृहरक्षक दलाचे ठाणे जिल्हा समादेशक संजय पाटील यांनी गृहरक्षक दलाच्या त्रेमासिक संमेलन प्रसंगी ठाण्यात दिली. यावेळी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणा-या ३३ जवानांचाही गौरव त्यांच्या हस्ते करण्यात आला.
येथील मुख्य डाक कार्यालयाजवळ असलेल्या पोलिसांच्या सिद्धी सभागृह येथे ७ जानेवारी रोजी गृहरक्षक दलाचे त्रैमासिक संमेलन पार पडले. त्यावेळी संमेजनाचे अध्यक्ष असलेल्या समादेशक पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी सुमारे २०० महिला आणि पुरुष कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्र मात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गृहरक्षक दलाच्या उपस्थित जवानांनी आपल्याला भेडसावणाºया अडचणीही यावेळी कथन केल्या. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून होमगार्डच्या जवानांचे मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचेही अनेकांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. प्रलंबित राहणारे मानधन वेळेत मिळावे त्याचबरोबर कायमस्वरुपी बंदोबस्ताची डयुटीही देण्यात यावी. तसेच आॅनडयुटी एखादा जवान जखमी किंवा मृत पावला तर त्याला किंवा त्याच्या कुटूंबियांना नुकसानभरपाई देण्यात यावी. या सर्व मागण्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार करण्यात येईल, असे आश्वासन समादेशक पाटील यांनी आपल्या जवानांना दिले.
* यांचा झाला विशेष सत्कार
यावेळी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाºया अनुराधा यादव, सोनल आमले, सिद्धार्थ गायकवाड, प्रकाश पाटील, अमर येंधे, किरण व्हटकर, तेजस चौधरी, कादंबरी घोडके, पंकज म्हात्रे, रवी गुंड, लक्ष्मण केणे, सचिन निर्मले, नंदा गार्डी आणि सिद्धार्थ जाधव आदींचा प्रशस्तीपत्रक देऊन समादेशक पाटील यांनी सत्कार केला.

Web Title:  The question of salary the Home Guard personnel will soon be resolved - Sanjay Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.