मच्छीविक्रेत्याला बोलण्यात गुंतवून सव्वा लाखाची चेन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:50 IST2021-07-07T04:50:37+5:302021-07-07T04:50:37+5:30

बदलापूर : मच्छी विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी बोलण्यात गुंतवून लबाडीने मच्छी विक्रेत्याची सव्वा लाख रुपये किमतीची ...

A quarter lakh lakh lamp by involving a fishmonger | मच्छीविक्रेत्याला बोलण्यात गुंतवून सव्वा लाखाची चेन लंपास

मच्छीविक्रेत्याला बोलण्यात गुंतवून सव्वा लाखाची चेन लंपास

बदलापूर : मच्छी विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी बोलण्यात गुंतवून लबाडीने मच्छी विक्रेत्याची सव्वा लाख रुपये किमतीची सोन्याची चेन व एक हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

दत्ताराम जगताप (६६) हे नेहमीप्रमाणे बदलापूर पश्चिमेकडील समर्थचौक परिसरात हातगाडीवर मच्छी विक्री करीत होते. त्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १ हजार रुपये रोख तसेच आधारकार्ड व पॅनकार्ड एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. सकाळी ६.३० वा. च्या सुमारास दोन व्यक्ती मच्छी खरेदी करण्याच्या बहाण्याने तेथे आले. त्यांनी मच्छीचा भाव विचारून मच्छी दाखवण्यास सांगून बोलण्यात गुंतवले आणि जगताप यांची सोन्याची चेन व रोख रक्कम ठेवलेली पिशवी लबाडीने चोरून नेली. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ए. आर. दोंदे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A quarter lakh lakh lamp by involving a fishmonger