शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आनंद दिघे स्मारकासाठी निधीची तरतूद करा, मनसे, भाजप आक्रमक; शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 23:45 IST

भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनीही स्मारकासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्याच्या प्रस्तावाची सूचना दिली आहे.

ठाणे : शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना...मात्र याच शिवसेनेला स्वर्गीय आनंद दिघे यांचा विसर पडल्याचा आरोप करीत गुरुवारी मनसेने ठाण्यात आनंद दिघे यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी ठामपा आयुक्तांची भेट घेतली. भाजपनेही अर्थसंकल्पात दिघे स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात भाजपच्या नगरसेवकाने प्रस्तावाची सूचनाही मांडली आहे.

मनसे आणि भाजप दिघे स्मारकासाठी आग्रही झाल्याने शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक झाल्यानंतर ठाण्यात दिघे यांचे स्मारक व्हावे या उद्देशाने गुरुवारी मनसेचे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जांभळी नाका परिसरातील उंच घड्याळाच्या मनोरच्या जागेवर स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली. सर्वपक्षीय नगरसेवकांचा निधी या कामी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचे नाव कायम स्मरणात राहणारे आहे. त्यांचे सर्वपक्षीयांबरोबर चांगले नाते होते. चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे त्यांचे स्मारक ठाण्यात व्हावे, अशी इच्छा असल्याचे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. स्मारकासाठी निधी मिळत नसेल तर मनसेचे पदाधिकारी घरोघरी जाऊन निधी गोळा करतील, असेही त्यांनी स्पष्ट करून शिवसेनेला डिवचण्याचे कामच केले आहे. दिघे यांची आठवण शिवसेनेला केवळ निवडणुकीपुरतीच होते. इतर वेळेस त्यांचा विसर पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजप नगरसेवकानेही दिले निवेदन 

भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनीही स्मारकासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्याच्या प्रस्तावाची सूचना दिली आहे. दिघे यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय होते. राजकीय मंडळींसाठी ते हक्काचा आधार होते. त्यामुळेच त्यांचे स्मारक व्हावे, अशी इच्छा पाटील यांनी व्यक्त केली आहे. २०२१-२२ मध्ये ५० कोटी आणि २०२२-२३ मध्ये ५० कोटी अशा दोन टप्प्यांत या निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, स्थायीचे सभापती संजय भोईर आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे दिले आहे.

 

टॅग्स :MNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका