शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

ठाण्यात २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून मराठा समाजाने केला शासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 2:09 PM

आधीच हाक दिल्याप्रमाणे मराठा समाजाने आज शहरात कोणत्याही स्वरुपाचा बंद पाळला नाही. या उलट आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून सकल मराठा समाजाने तोंडाला काळ्या पट्या लावून शासनाचा निषेध केला.

ठळक मुद्देशहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्यासुरक्षेच्या दृष्टीकोणातून चोख पोलीस बंदोबस्त

ठाणे - सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ९ आॅगस्टचा बंद ठाण्यात असणार नसल्याचे सांगितले असले ठाण्याचा वेग मात्र गुरुवारी कमी झालेला दिसला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहराच्या मुख्य रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अनेक ठिकाणी उत्सुफुर्तपणे मॉल, दुकाने सकाळच्या सत्रात बंद होती. तसेच रस्त्यावर वाहतुकही कमी होती. तर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी १० ते ११ या वेळेत शहरातील विविध सहा ठिकाणी २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली. तर सीमेवर वीर मरण पत्करलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनासुध्दा श्रंध्दाजली वाहण्यात आली. परंतु तोंडाला काळ्या पट्या लावून सकल मराठा समाजाने शासनाचा निषेधही केला.                               मराठा आरक्षणासाठी गुरुवारी ठाणे जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार नसल्याचे बुधवारीच सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. समाजातील तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय सर्वानुमते सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुतात्म्यांना सकाळी १० ते ११ वा. या वेळात श्रद्धांजली वाहून सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अष्टविनायक चौक (कोपरी), कळवा नाका, वर्तकनगर नाका, वागळे प्रभाग समिती, सुरज वॉटर पार्क (वाघबीळ) या सहा ठिकाणी मूक श्रद्धांजली वाहण्यात येईल. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोर्चा, रॅली, रास्तारोको अथवा घोषणाबाजीसुध्दा यावेळी करण्यात आली नाही. येत्या १६ आॅगस्ट रोजीसुध्दा पुढील आंदोलन केले जाणार असून त्याची दिशा लवकरच ठरविली जाईल असेही यावेळी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु २५ जुलै रोजी जो काही प्रकार झाला त्यानंतर असा प्रकार होऊ नये यासाठी मराठा समाजाच्या मंडळींनी काळजी घेऊन केवळ श्रंध्दाजली वाहीली.                       सकल मराठा समाजाने ज्या सहा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय शहरातील मुख्य हायवे, मुख्य रस्ते, घोडबंदर भागातील रस्ते याठिकाणीसुध्दा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तर काही ठिकाणी ड्रोन कॅमेºयाची नजर सुध्दा ठेवण्यात आली होती. परंतु २५ जुलै सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास काय करायचे अशी काहीशी भितीसुध्दा अनेकांच्या मनात होती. त्यामुळे शहरातील बहुसंख्य शाळांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, तर ज्या ठिकाणी परीक्षा सुरु होत्या, त्या ठिकाणी विद्यार्थी मात्र परीक्षेसाठी हजर होते. तर शहरातील महाविद्यालये सुरु असली तरी देखील तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी कमी होती. शिवाय रोज गजबजलेले रस्त्यांवर मात्र शुकशुकाट होता. वाहनांची संख्यासुध्दा रोडावल्याचे दिसून आले, रस्ते मोकळे होते, शहरातील मॉलसुध्दा सकाळच्या सत्रात बंद होते. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुध्दा सुरळीत सुरु होती. परंतु असे जरी असले तरी एकूणच बंदच्या पार्श्वभूमींवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अनेक दुकानदारांनी, खाजगी आॅफीसेस, व्यावसायिक यांनी सकाळ सत्रात आपली सेवा बंद ठेवली होती. 

टॅग्स :thaneठाणेMorchaमोर्चाmarathaमराठा