भिवंडीत टोरंट पावर विरोधात धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 19:20 IST2024-02-26T19:20:50+5:302024-02-26T19:20:57+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेते पुढारी जोपर्यंत टोरंट विरोधात मोहीम उभारत नाहीत तोपर्यंत उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन देखील आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आले.

भिवंडीत टोरंट पावर विरोधात धरणे आंदोलन
भिवंडी: भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनी च्या विरोधात कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेते पुढारी जोपर्यंत टोरंट विरोधात मोहीम उभारत नाहीत तोपर्यंत उमेदवारांना मतदान करू नका असे आवाहन देखील आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आले. त्याचबरोबर मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्यावर केलेल्या तडीपार कारवाईचा देखील निषेध करण्यात आला.