माळशेज घाटात भूस्खलनसह संरक्षक भींत पडली; महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न

By सुरेश लोखंडे | Published: August 5, 2019 04:38 PM2019-08-05T16:38:44+5:302019-08-05T16:45:32+5:30

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पूर सदृश्य स्थिती उद्भवली. गावखेड्यांच्या बहुतांशी रहिवाशांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या कल्याण - अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडले. तर या घाटातील सावर्णे गावापासून जवळच असलेली ८५/६०० क्रमांकाची नोंद असलेली रस्त्याच्या कडेची संरक्षक भींत पडली

Protectors were also flooded with landslides in the Malashej Ghat; Attempts to restore highway traffic | माळशेज घाटात भूस्खलनसह संरक्षक भींत पडली; महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न

दुरूस्तीचे काम जलद गतीने सुरू आहे. संध्याकाळपर्यंत महामार्गावरील सर्व कामे पूर्ण करणार

Next
ठळक मुद्देरस्त्याच्या कडेची संरक्षक भींत पडलीभूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावरदुरूस्तीचे काम जलद गतीने सुरू

सुरेश लोखंडे
ठाणे :जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले. या दरम्यान सोमवारी सकाळी कल्याण - अहमदनगर महामार्गावरमाळशेज घाटात संरक्षक भींत व भूस्खलन झाले. तसेच याच महामार्गावरील कल्याण जवळील रायते पुलास लागून असलेला रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद करून दुरूस्तीचे कामे युध्द पातळीवर सुरू आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक लवकरच पूर्वपदावर येण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पूर सदृश्य स्थिती उद्भवली. गावखेड्यांच्या बहुतांशी रहिवाशांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या कल्याण - अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडले. तर या घाटातील सावर्णे गावापासून जवळच असलेली ८५/६०० क्रमांकाची नोंद असलेली रस्त्याच्या कडेची संरक्षक भींत पडली आहे. याशिवाय भूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावर पडलेला. या घटनांसह उल्हासनदीच्या पुरात रायता ब्रीजजवळील रस्ता वाहून गेला. गेल्या आठवड्यात देखील हा रस्ता वाहून गेला होता.
या भूस्खलनाप्रमाणेच या महामार्गावर मोरोशी चेक नाक्याच्या परिसरात झाडे पडले आहेत. मातीचा ढिग रस्त्यावर आहे. मोरोशी व आवळ्याची वाडी या परिसरासह सावर्णे गावाजवळी आणि ठिकठिकाणच्या भूस्खलनाच्या मातीचा ढिगारा जेसीपी मशिनच्या सहाय्याने युध्दपातळीवर हटवण्याचे काम सुरू आहे. या शिवाय रायता ब्रीजजवळील रस्ताही दुरूस्तीचे काम जलद गतीने सुरू आहे. संध्याकाळपर्यंत महामार्गावरील सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी लोकमतला सांगितले. यामुळे सोमवारी रात्री या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र घाटात कमी, अधिक पावसाच्या श्रावणसरींसह धुके मोठ्याप्रमाणात दाटले आहे. यामुळे घाटातील या महामार्गावरील दुरूस्तीच्या कामात व्यत्यय येतना दिसून येत आहे.
..............
फोटो - ०५ठाणे माळशेज घाट

Web Title: Protectors were also flooded with landslides in the Malashej Ghat; Attempts to restore highway traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.