अंबरनाथमध्ये शिवालिक नगर सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 18:18 IST2021-06-09T18:18:29+5:302021-06-09T18:18:44+5:30
या सोसायटीच्या मेन गेट समोरच खड्डा खोदून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलीये. त्यामुळे या भिंतीला आधार राहिला नव्हता. त्यातच आजच्या पावसामुळे भिंतीखालची माती खचून संपूर्ण भिंतच खड्ड्यात पडली.

अंबरनाथमध्ये शिवालिक नगर सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली
अंबरनाथ : मुसळधार पावसामुळे सोसायटीची भिंत कोसळल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या शिवालिक नगर सोसायटीत ही घटना घडली. आज सकाळपासून अंबरनाथ शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे शिवालिक नगर सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळची भिंत शेजारी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कोसळली.
या सोसायटीच्या मेन गेट समोरच खड्डा खोदून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलीये. त्यामुळे या भिंतीला आधार राहिला नव्हता. त्यातच आजच्या पावसामुळे भिंतीखालची माती खचून संपूर्ण भिंतच खड्ड्यात पडली. या ठिकाणी अनेक लहान मुलांचा वावर असून त्यामुळे आता सोसायटीने आणि शेजारील बांधकाम करणाऱ्या बिल्डरने सुरक्षात्मक उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नव्या इमारतीचे काम करत असताना संबंधित बांधकाम व्यवसाय काढणे जुन्या सोसायटीच्या संरक्षक भिंतीला आधार देणार एस आर सी ची भिंत उभारणे गरजेचे होते मात्र ती भिंत उभारल्याने जुन्या सोसायटीची ही भिंत पडली आहे. सुदैवाने त्यात कोणालाही इजा झालेली नाही.