स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव ठामपाने रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:22 PM2020-09-13T23:22:03+5:302020-09-13T23:27:52+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी ६४  लाख रुपयांचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.

The proposal of Rs. 3 crore 64 lakhs for a clean survey consultant should be strongly rejected | स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी ६४ लाख रुपयांचा प्रस्ताव ठामपाने रद्द करावा

महापालिका आयुक्तांकडे केली मागणी

Next
ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांकडे केली मागणीकोरोनाच्या आपत्तीतही सर्वेक्षण कंपन्यांवर कोट्यवधींची उधळण! भाजपा नगरसेवक नारायण पवार यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाच्या आपत्तीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना, ठाणे महापालिकेकडून सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांवर कोट्यवधींची उधळण सुरूच आहे. आतापर्यंत सर्वेक्षणानंतर तयार केलेले प्रकल्प फसलेले असतानाही महापालिकेची ही उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप करीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण सल्लागारासाठी तीन कोटी 64 लाख रु पयांचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. एकीकडे नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता आणि पाणीपट्टी कर आकारणीत सवलत देण्याच्या विषयावर महासभेत चर्चाही होत नाही. कंत्राटदारांना देण्यासाठी पैसे नसल्यामुळे शहरातील अनेक विकास कामे ठप्प आहेत. महापालिकेला मासिक खर्चही भागविण्यासाठी मुदतठेवी मोडण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत महापालिकेने अनावश्यक खर्च वाचिवण्याची गरज आहे. मात्र, 18 सप्टेंबर रोजीच्या महासभेत स्वच्छ सर्वेक्षण सल्लागार नेमण्यासाठी तब्बल तीन कोटी 84 लाखांचा प्रस्ताव सादर केला आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे.
महापालिकेच्या घनकचरा, आरोग्य विभागासह विविध विभागांमध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, सातत्याने सल्लागार नेमण्याच्या निर्णयांमुळे महापालिकेचा आपल्याच अधिकाºयांवर विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत स्मार्ट सिटी, सॅटीस, उड्डाणपूल, एकात्मिक नालेबांधणी, मलवाहिनी प्रकल्प, ट्राम रेल्वे, रिंग रूट प्रकल्प, खाºया पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर आदी प्रकल्पांमध्ये सल्लागाराची नियुक्ती केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. स्मार्ट सिटीची बहूसंख्य कामे रखडलेली आहेत. काही कामे 1 टक्का पूर्ण झाली. सॅटीस पूलाखाली अग्निशमन वाहनही जात नाही. मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूलावरु न एकेरी वाहतूक सुरू आहे, चौकाचौकात नाले आणि मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होत असल्याचा सातत्याने प्रकार होत आहे. ट्राम रेल्वे, रिंगरु ट व खाºया पाण्याचा प्रकल्प गुंडाळण्यात आला अशा परिस्थितीत सल्लागारांचा उपयोग काय? सल्लागारांच्या माध्यमातून कोणाच्या तुंबडया भरल्या जात आहेत, असा थेट सवाल पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
...तर अधिका-यांच्या पगारातून
सल्लागाराचा खर्च घ्या : पवार
गेल्या काही वर्षात तांत्रिक सल्लागाराच्या नियुक्तीच्या माध्यमातून महापालिकेचे पर्यायाने ठाणेकरांचे कोट्यवधी रु पये पाण्यात गेले आहेत. महापालिकेतील अधिकारी अकार्यक्षम असल्याचे मानून सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेतला जात असल्यास, प्रत्येक प्रकल्पातील अधिका-यांच्या वेतनातून सल्लागारांचा खर्च घ्यायला हवा, असेही मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: The proposal of Rs. 3 crore 64 lakhs for a clean survey consultant should be strongly rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.