क्रमिक पुस्तकांचे प्रकाशक बदलण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:36 IST2021-07-26T04:36:44+5:302021-07-26T04:36:44+5:30

मुंब्रा : दिव्यातील एसएमजी शाळेच्या व्यवस्थापकांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून क्रमिक पाठ्यपुस्तकांचे प्रकाशक बदलण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे ...

Promise to change the publisher of serial books | क्रमिक पुस्तकांचे प्रकाशक बदलण्याचे आश्वासन

क्रमिक पुस्तकांचे प्रकाशक बदलण्याचे आश्वासन

मुंब्रा : दिव्यातील एसएमजी शाळेच्या व्यवस्थापकांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून क्रमिक पाठ्यपुस्तकांचे प्रकाशक बदलण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. प्रकाशक बदलल्यामुळे पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची बाब पालकांनी मागील काही दिवसांमध्ये केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर तसेच शाळेच्या परिसरात ठिय्या आंदोलने करून व्यवस्थापकांच्या निर्दशनास आणून दिली होती. याविरोधात तसेच वाढीव फीबाबत पालकांच्या शिष्टमंडळाने नुकताच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. त्यावेळी त्यांनी शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शाळेच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली असता व्यवस्थापकांनी हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रे यांनी लोकमतला दिली.

Web Title: Promise to change the publisher of serial books