शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

पुरोहितांनाही महागाईचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 2:57 AM

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी यंदा अडीच हजार पुरोहित डोंबिवलीत दाखल झाले आहेत.

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी यंदा अडीच हजार पुरोहित डोंबिवलीत दाखल झाले आहेत. महागाईमुळे यजमानांकडून बुकिंग झाले नसल्याने पुरोहितांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत रोडावली आहे.पुरोहित ल. कृ. पारेकर गुरुजी म्हणाले, श्रावण ते गणपती आणि नवरात्रात मराठवाडा, सोलापूर, खान्देश आणि कोकणातून डोंबिवली व ठाण्यातील उपनगरात पुरोहित येतात. यंदा डोंबिवलीत अडीच हजार पुरोहित आले आहेत. गणेश पूजनासाठी त्यांचा दोन दिवसांचा मुक्काम असतो. परप्रांतातून येणाऱ्या पुरोहितांचे यजमान ठरलेले असतात. ते त्यांच्याशी थेट संपर्क साधतात. डोंबिवलीतील यजुर्वेदीय आणि ऋग्वेदीय पुरोहित मंडळांचा पुरोहितांना बुकिंगसाठी उपयोग होत नाही. त्यामुळे पुरोहितांना गणेश पूजनाची कामे एकमेकांच्या ओळखीने मिळतात. डोंबिवलीत अथर्वशीर्ष मंत्रपठण करणारे मंडळ आहे. तेही मंत्रपठणासाठी पुरोहित देतात.डोंबिवली शहरात घरगुती व सार्वजनिक मंडळांचे मिळून जवळपास सव्वालाख गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. डोंबिवलीत आठ हजार पुरोहित आहेत. परगावाहून आलेले पुरोहित मुंबई, विरार, नवी मुंबई, बदलापूर या विभागात जाऊन गणेशपूजन करतात. पुरोहितांकडून शहराची विभागणी क रून घेतली जाते. एखादा पुरोहित ठाण्यात गेल्यास त्या परिसरातील पूजाही त्यांच्याकडे दिल्या जातात. डोंबिवली शहराचीही चार भागांत विभागणी होते. डोंबिवली पूर्व, पश्चिम, ठाकुर्ली आणि आयरे गाव अशा चार ठिकाणी एक-एक पुरोहित जातात, असे पारेकर म्हणाले.>दक्षिणेत वाढमहागाई वाढल्याने दक्षिणाही वाढली आहे. मागील वर्षी एका पूजनासाठी पुरोहिताला दीड हजार रुपये दक्षिणा मिळायची. यंदा ती २१०० ते २५०० रुपये झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत बुकिंग १० टक्क्यांनी कमी झाले आहे. यजमानांकडून बुकिंग नसल्याने पुरोहितांची संख्या रोडावली आहे, याकडे पारेकर यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सव