आहेर मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू 

By अजित मांडके | Updated: March 2, 2023 21:08 IST2023-03-02T21:07:33+5:302023-03-02T21:08:10+5:30

ठाणे शहरातून तडीपारीची कारवाई ठाणे पोलिसांनी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

process of disciplinary action against ncp workers in the assault case is underway | आहेर मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू 

आहेर मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांविरोधात तडीपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक संदेश प्रसारीत करून केला होता. त्यांचा हा दावा खरा ठरत असून हेमंत वाणी आणि अभिजीत पवार यांच्यावर ठाणे शहरातून तडीपारीची कारवाई ठाणे पोलिसांनी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामध्ये हेमंत वाणी आणि आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार यांचाही सामावेश होता. याप्रकरणातनौपाडा पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. दरम्यान त्यांच्यावर तडीपारीची कारवाई ठाणे पोलिसांनी सुरू केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

Web Title: process of disciplinary action against ncp workers in the assault case is underway