घोडबंदर रोडवरील टोलनाका जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू, मोठ्या प्रमाणात जमा होणार भंगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 18:57 IST2021-07-25T18:57:14+5:302021-07-25T18:57:45+5:30
Thane : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे घोडबंदर रस्त्याचे हाल झाले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.

घोडबंदर रोडवरील टोलनाका जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू, मोठ्या प्रमाणात जमा होणार भंगार
- विशाल हळदे
ठाणे : घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल चौकाजवळचा टोलनाका जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील अवाढव्य लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. सततच्या पावसामुळे घोडबंदर रस्त्याचे हाल झाले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.
आधीच घोडबंदर रोड म्हटला की, वाहनचालकांच्या अंगावर काटा येतो. त्यातच रस्त्याची दूरवस्था झाल्याने येथील वाहतूक मंदगतीने सुरू असते. अशातच टोलनाका प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांतून हा टोलनाका बंद करण्यात आला होता. त्यामुळे टोलनाका बंद असला तरी, टोलनाका बांधण्यासाठी अवाढव्य लोखंडी कमान अद्यापही कायम आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.
ठाणे : घोडबंदर रोडवरील फाऊंटन हॉटेल चौकाजवळचा टोलनाका जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील अवाढव्य लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम हाती घेतले आहे. (व्हिडीओ-विशाल हळदे)https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/VDRPdw5p4X
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021
ही लोखंडी कमान हटवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले आहे. त्यासाठी लोखंडाचे मोठमोठे खांब कापून काढले जात आहेत. यातून मोठ्या प्रमाणात भंगार जमा होणार असून, साधारण आठवडाभरात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्डेच खड्डे! https://t.co/ij04KJqq6b#Thane
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2021