शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

प्रस्तावित मुंबई-नवी मुंबई विमानतळ मेट्रोला घेणार खासगीकरणाचा टेकू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 1:12 AM

येत्या काळात लवकरच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मेट्रोने जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : येत्या काळात लवकरच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मेट्रोने जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. याच जोडीला कांजूरमार्ग ते बदलापूर हा नवा जलद मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. मात्र, येत्या वर्षांत १६,२९४ कोटींचे ७४ विकास प्रकल्प हाती घेणाऱ्या एमएमआरडीएने निधीची कमतरता असल्याचे सांगून हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी किंवा स्विस चॅलेंज पद्धतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. निधीची चणचण आणि तांत्रिक मनुष्यबळाची कमतरता यामुळे खासगीकरण किंवा स्विस चॅलेंज हाच आधार असल्याचे एमएमआरडीएने मुख्यमंत्र्यांना पटवून दिले आहे.सध्या या दोन्ही प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून तो पूर्ण झाल्यावरच त्यांच्यासाठी किती कोटींचा खर्च येईल, याचा अंदाज बांधण्यात येणार आहे. एमयूटीपी ३ अ मधील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिलन ते पनवेल हा साडेबारा हजार कोटींचा प्रकल्प गुंडाळल्यावर एमएमआरडीएने हे दोन नवे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. मात्र, दोन आंतररराष्ट्रीय विमानतळे मेट्रोने जोडल्यास त्याचा मुंबई व नवी मुंबई या दोन्ही शहरांतील प्रवाशांना फायदा होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला.कांजूरमार्ग ते बदलापूर हा मेट्रो मार्ग ४४.७ किमीचा असून त्यावरून २०४१ पर्यंत ९.९५ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. तसेच या मार्गामुळे मुंबईची पश्चिम उपनगरे ही बदलापूर परिसरास जोडली जाणार असून हा मार्ग उल्हासमार्गे प्रस्तावित केला आहे.स्विस चॅलेंज काय आहे?आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विस चॅलेंज पद्धती ही एक नव्याने उदयास आलेली निविदा प्रक्रि या आहे. यात खाजगी व्यक्ती किंवा संस्था या स्वत:हून सार्वजनिक निकड असलेले व खासगीकरणातून करता येऊ शकणारे प्रकल्प निवडून स्वत:हून तसा प्रस्ताव शासनास सादर करतात. ही नावीन्यपूर्ण पद्धत भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान राज्यात राबविण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने ती अंगीकारून तसे धोरण १६ फेबु्रवारी २०१८ रोजी जाहीर केले आहे. यात प्रथम प्रस्ताव सादर करणाºयास मूळ सूचक असे म्हटले जात असून त्याने सादर केलेल्या प्रस्तावानंतर स्पर्धात्मक निविदा मागविल्या जातात. त्यानंतर किफायतशीर प्रस्ताव देणाºया निविदाकाराने जो प्रस्ताव दिलेला असतो त्यास मिळताजुळता प्रस्ताव सादर करण्याची संधी पुन्हा मूळ सूचकास दिली जाते. ती जर किफायतशीर व स्पर्धात्मक असेल तर त्यास ते काम दिले जाते. मात्र, केंद्रीय सतर्कता आयोगाने या पद्धतीत पारदर्शकता नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तरीही एमएमआरडीए स्विस चॅलेंज पद्धत सुचविली आहे.विमानतळ मेट्रो ३३.१५ किमीचीमुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा मेट्रो मार्ग ३३.१५ किमीचा राहणार असून त्यावरून २०४१ पर्यंत ८.७३ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. या मार्गाचा घणसोली, वाशी, पनवेल या परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.स्विस कंपन्यांनी दिले प्रस्तावदोन्ही मेट्रो मार्गांच्या पायाभूत वित्तीय रचनांचा जसे की स्थापत्य कामांचा खर्च प्राधिकरणामार्फत आणि प्रणाली, कार्य, देखभाल-दुरुस्ती बाह्य संस्थामार्फत करण्याबाबतही अभ्यास सुरू असून केंद्र शासनाच्या मेट्रो धोरणानुसारच हे दोन्ही प्रकल्पही राबविण्यात येणार आहेत. यासाठी M/s.LASANE Infra Xआणि M/s.Swiss  Rapid A.G. Switzerland  यांसारख्या संस्थांनी मॅगलेव्ह रेल्वे प्रणालीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रस्तावही एमएमआरडीएकडे सादर केले आहेत.

टॅग्स :Metroमेट्रो